कैलाश वाजपेयी
कैलाश वाजपेयी (११ नोव्हेंबर, इ.स. १९३६ - १ एप्रिल, इ.स. २०१५) हे एक प्रतिभावान हिंदी कवी होते.
कैलाश वाजपेयींचे मोठेपण त्यांच्या बहुभाषाकोविदत्वाने (स्पॅनिश, जर्मन, इंग्रजी) आणि भारतीय लोककथांपासून वेदोपनिषदे आणि सूफी संत परंपरा, तुकाराम इथपर्यंतच्या त्यांच्या अभ्यासाने अधिक खुलले होते.
३४ पुस्तके, २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक साहित्य सन्मान, अशी कैलाश वाजपेयी यांची सिद्धी आहे. ते केवळ कवि- निबंधकार- साहित्यिक होते असे नव्हे, तर ज्योतिषशास्त्रावरील पाचही प्रमुख ग्रंथांच्या सखोल अभ्यासानंतर, 'लंकोदया'च्या त्रुटीमुळे फलज्योतिषाचा खटाटोप व्यर्थ ठरतो, असा निष्कर्ष त्यांनी जाहीर केला.
कैलाश वाजपेयी यांनी दिल्ली दूरदर्शनसाठी कबीर, सूरदास, जे कृष्णमूर्ति, व रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरर लघुपट बनवले होते. वाजपेयी हे अनेक वर्षे दूरदर्शनच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांनी १९६७मध्ये झेकोस्लोवाकियाचा आणि ’सांस्कृतिक देवाणघेवाण’ कार्यक्रमाच्या निमित्ताने १९७०मध्ये फ्रान्स, रशिया, जर्मनी, स्वीडन व अन्य युरोपीय देशांचा दौरा केला होता.
कैलाश वाजपेयी यांची पुस्तके
संपादन- तीसरा अंधेरा
- देहात से हटकर
- भविष्य घट रहा है
- युवा संन्यासी (विवेकानंदांवरील नाटक)
- शब्द संसार
- संक्रांत
- सूफीनामा
- हवा में हस्ताक्षर (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक)
कैलाश वाजपेयी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
संपादन- साहित्य अकादमी पुरस्कार (२००९)
- एसएस मिलेनियम ॲवॉर्ड (२०००)
- व्यास सन्मान (२००२)
- ह्यूमन केर ट्रस्ट ॲवॉर्ड (२००५)
- अक्षरम्चा विश्व हिंदी साहित्य शिखर सन्मान (२००८)