के. चंद्रशेखर राव

भारतीय राजकारणी

कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव (तेलुगू: కల్వకుంట్ల చంద్రశేఖరరావు - कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव; १७ फेब्रुवारी १९५४) हे भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले व माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्यावाहिल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत राव ह्यांच्या नेतृत्वाखाली टी.आर.एस.ने दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले.

कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव

कार्यकाळ
२ जून २०१४ – ७ डिसेंबर २०२३
मागील पदनिर्मिती
पुढील अनुमुला रेवंत रेड्डी
मतदारसंघ गजवेल

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील डी. विठ्ठल राव
पुढील ए.पी. जितेंद्र रेड्डी
मतदारसंघ महबूबनगर
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील सी. विद्यासागर राव
पुढील पूनम प्रभाकर
मतदारसंघ करीमनगर

जन्म १७ फेब्रुवारी, १९५४ (1954-02-17) (वय: ७०)
चिंतामदाका, आंध्र प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारत राष्ट्र समिती

पूर्वीचे जीवन

संपादन

चंद्रशेखरराव यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५४ ला सिद्दिपेट जवळील चींतमडका या गावी झाला आहे. आणि हे गाव सद्या तेलंगणा राज्यात आहे. राव यांना ९ बहिणी आणि १ मोठे भाऊ होते. त्यांनी उस्मानिया विद्यापीठांतर्गत हैद्राबाद येथुन तेलगु भाषे मधे एम.एची पदवी प्राप्त केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "K Chandrashekar Rao: Know The Journey Of The 'architect' Of Telangana Movement". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2021-09-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन