तेलंगणाचे मुख्यमंत्री
तेलंगणाचे मुख्यमंत्री हे भारताच्या तेलंगणा राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
तेलंगणाचे मुख्यमंत्री
తెలంగాణ రాష్ట్ర ముఖ్యమంత్రి Chief Minister of The State of Telangana | |
---|---|
चित्र:Emblem of Telangana.png तेलंगणाची राजमुद्रा | |
![]() भारतीय ध्वजचिन्ह | |
शैली | राज्यसरकार प्रमुख |
सदस्यता | तेलंगणा विधानसभा अथवा तेलंगणा विधान परिषद |
वरिष्ठ अधिकारी | तेलंगणा राज्यपाल |
नियुक्ती कर्ता | तेलंगणाचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
२०१४ साली आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. २ जून २०१४ रोजी के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले, तर ७ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुमुला रेवंत रेड्डी यांनी दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
यादी
संपादनहैदराबादचे मुख्यमंत्री (१९४९-१९५६)
संपादनक्र | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूक | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
हैदराबाद राज्य (१९४८-१९५६) (१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन. १७ सप्टेंबर १९४८ ते ३१ नोव्हेंबर १९४९ पर्यंत राज्य लष्करी राजवटीखाली. १ डिसेंबर १९४९ रोजी अंतरिम मंत्रीमंडळाचे गठण व पहिली विधानसभा निवडणूक १९५२ साली घेण्यात आली.) | ||||||||
१ | मुल्लठ कडिंगी वेल्लोडी (१८९६-१९८७) (मतदारसंघ: नियुक्त) |
१ डिसेंबर १९४९ | ६ मार्च १९५२ | २ वर्षे, ९६ दिवस | — (अंतरिम मंत्रीमंडळ) |
अपक्ष | ||
२ | डॉ. बर्गला रामकृष्ण राव (१८९९-१९६७) (मतदारसंघ: शादनगर) |
६ मार्च १९५२ | ३१ ऑक्टोबर १९५६ | ४ वर्षे, २३९ दिवस | १९५२ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
(१ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६द्वारे हैदराबाद राज्य आणि आंध्र राज्य ही दोन राज्ये एकत्र करून नवीन आंध्र प्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.) |
तेलंगणाचे मुख्यमंत्री (२०१४ पासून)
संपादनक्र | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूक | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
तेलंगणा राज्य (२०१४ पासून) (१ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम, २०१४ द्वारे आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन केले गेले व वेगळ्या तेलंगण राज्याची स्थापना करण्यात आली. तेलंगण हे भारतीय संघराज्याचे २९वे राज्य बनले.) | ||||||||
१ | कल्वकुंटला चंद्रशेखर राघव राव (जन्म १९५४) (मतदारसंघ: गजवेल) |
२ जून २०१४ | ७ डिसेंबर २०२३ | ९ वर्षे, १८८ दिवस | २०१४ ————————— २०१८ |
भारत राष्ट्र समिती | ||
२ | अनुमुला रेवंत रेड्डी (जन्म १९६९) (मतदारसंघ: कोडंगल) |
७ डिसेंबर २०२३ | पदस्थ | १ वर्ष, २१४ दिवस | २०२३ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |