केंद्रीय विद्यापीठ (राजस्थान)
(केंद्रीय विद्यापीठ, राजस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)
केंद्रीय विद्यापीठ, राजस्थान हे अजमेर, राजस्थान येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. ह्यामध्ये १२ शाळा, ३० शैक्षणिक विभाग आणि एक सामुदायिक महाविद्यालय आहे ज्यात तंत्रज्ञान, विज्ञान, मानविकी, वाणिज्य, व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण आणि सामाजिक विज्ञान कार्यक्रमांचा समावेश आहे ज्यात वैज्ञानिक, तांत्रिक आणि सामाजिक शिक्षण तसेच संशोधनावर भर आहे.
central university located in Ajmer, Rajasthan, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | अजमेर, अजमेर जिल्हा, अजमेर विभाग, राजस्थान, भारत | ||
स्थापना |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ह्याची स्थापना ३ मार्च २००९ रोजी संसदेच्या कायद्याद्वारे केंद्रीय विद्यापीठ म्हणून करण्यात आली. विद्यापीठाची सुरुवात २००९-१० मध्ये मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूरमध्ये झाली.
विद्यापीठ जयपूर-अजमेर एक्सप्रेसवे ( NH-8) वर, जयपूरपासून ८३ किलोमीटर (५२ मैल) आणि अजमेरपासून ४० किलोमीटर (२५ मैल) अंतरावर आहे आणि ह्याच् आ परिसर 209 हेक्टर (518 एकर) पेक्षा जास्त आहे.