कॅन्सस
(कॅन्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅन्सस (इंग्लिश: Kansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. [१]अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले कॅन्सस क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १५ वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४ व्या क्रमांकाचे राज्य आहे.[२]
कॅन्सस Kansas | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | टोपेका | ||||||||||
मोठे शहर | विचिटा | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत १५वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,१३,०९६ किमी² | ||||||||||
- रुंदी | ६४५ किमी | ||||||||||
- लांबी | ३४० किमी | ||||||||||
- % पाणी | ०.५६ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३४वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २८,५३,११६ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १२.७/किमी² (अमेरिकेत ४०वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $५०,१७७ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २९ जानेवारी १८६१ (३४वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-KS | ||||||||||
संकेतस्थळ | www.kansas.gov |
कॅन्ससच्या उत्तरेला नेब्रास्का, पूर्वेला मिसूरी, पश्चिमेला कॉलोराडो, तर दक्षिणेला ओक्लाहोमा ही राज्ये आहेत. टोपेका ही कॅन्ससची राजधानी तर विचिटा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. कॅन्सस सिटी ह्या नावाचे मोठे शहर वास्तविकपणे मिसूरी राज्यात असून त्याची अनेक उपनगरे कॅन्ससमध्ये मोडतात.
[३]ऐतिहासिक काळापासून इंडियन अदिवासी समाजातील असंख्य जातींचे कॅन्सस भागात वास्तव्य राहिले आहे. सध्या कॅन्सस हे अमेरिकेमधील सर्वात मोठ्या कृषीप्रधान राज्यांपैकी एक आहे. येथे गहू, ज्वारी व सूर्यफूल ह्या पिकांची मोठ्या प्रमाणावर शेती होते.[४]
गॅलरी
संपादन-
कॅन्सस सिटीचे कॅन्ससमधील एक उपनगर.
-
कॅन्ससमधील स्प्रिंग नदी.
-
कॅन्ससमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
-
कॅन्सस राज्य संसद भवन.
-
कॅन्ससचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- ^ "Current Statistical Area Lists and Delineations - People and Households - U.S. Census Bureau". web.archive.org. 2017-01-27. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-01-27. 2022-05-07 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "२०२० जनगणना" (PDF).
- ^ "A Review of Early Navigation on the Kansas River - Kansas Historical Society". www.kshs.org. 2022-05-07 रोजी पाहिले.
- ^ "Kansas Agriculture". www.agriculture.ks.gov. 2022-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-07 रोजी पाहिले.