कूलोंब

(कूलॉंब या पानावरून पुनर्निर्देशित)

कूलोंब हे विद्युत प्रभाराचे SI एकक आहे. त्याचे चिन्ह C हे आहे. कूलोंब म्हणजे एक ॲम्पिअर विद्युत प्रवाहाने एका सेकंदात प्रवाहित केलेला प्रभार:

हे एक फॅरडचे धारित्र एक व्होल्ट विभवांतरापर्यंत प्रभारित केल्यास त्यावरील अतिरिक्त प्रभार आहे:

एक कूलोंब प्रभाराचे ते प्रमाण आहे जे एक मीटरवरील समान प्रभाराला ९ x १० न्यूटन बलाने अपकर्षित करतो.

व्याख्या

संपादन

एस.आय. प्रणालीमध्ये कूलोंबची व्याख्या ॲम्पिअर आणि सेकंद यांच्या दृष्टीने केली जाते. १ C = १ A × १ s.[]

इलेक्ट्रॉनचा प्रभार माहीत असल्याने (−१.६०२७६२०८(98)×10−१९ C,[]) −१ Cला अंदाजे 6.241509×10^18 electronsचा प्रभार (किंवा +१ C तेवढ्या प्रोटॉन किंवा पॉझिट्रॉनचा प्रभार) असे गृहीत धरू शकतो.

संदर्भ

संपादन
  1. ^ "SI brochure, section 2.2.2".
  2. ^ "CODATA Value: elementary charge". The NIST Reference on Constants, Units, and Uncertainty. 2015-09-22 रोजी पाहिले. 2014 CODATA recommended values