कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातील सेवा निवृत्त अधिकारी आहेत. यांचा जन्म १६ एप्रिल १९७० रोजी झाला होता. इ.स. २००१ मध्ये ते नैदलातून निवृत्त झाले आणि ते निवृत्तीनंतर इराणमध्ये व्यवसाय करीत होते. पाकिस्तानी दाव्यानुसार दहशतवाद आणि भारताच्या गुप्तचर संस्था, रिसर्च ॲंड अ‍ॅनालिसिस विंगसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना पाकिस्तानी प्रांत बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. [][] १० एप्रिल २०१७ रोजी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हणले आहे की, "गेल्या वर्षी त्यांचे इराणमधून अपहरण झाले होते आणि त्यानंतरच्या ते पाकिस्तानमध्ये आढळले परंतु त्यांची उपस्थिती कधीच विश्वासार्हतेने स्पष्ट केली नव्हती". []

कुलभूषण जाधव
जन्म

१६ एप्रिल, १९७० (1970-04-16) (वय: ५४)

[]
सांगली, महाराष्ट्र, भारत
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा माजी नौदल अधिकारी (भारतीय दावा)
नौदल अधिकारी (पाकिस्तानी दावा)
कारकिर्दीचा काळ १९८७ – २००१
जोडीदार चेतनकुल जाधव []
वडील सुधीर जाधव []
आई अवंती जाधव []
Military career
[[File:{{{चित्र}}}|frameless|alt=]]
सैन्यशाखा भारतीय नौदल
सेवावर्षे १९८७ - २००१ (भारतीय दावा)
१९८७ – सध्या (पाकिस्तानी दावा)[]

पाकिस्तानी सरकारने नमूद केले की ते भारतीय नौदलातील सर्व्हिस कमांडर होते जे पाकिस्तानच्या आत विध्वंसक कार्यात सहभागी होते आणि ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधील काउंटर-इंटेलिजेंस ऑपरेशन दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. [][१०] भारत सरकारने जाधव यांना माजी नौदल अधिकारी म्हणून मान्यता दिली परंतु त्यांच्याशी सध्याचा संबंध नाकारला आणि त्यांनी अकाली सेवानिवृत्ती घेतल्याची कबुली दिली आणि त्यांचे इराणमधून झालेले अपहरण देखील नमूद केले. [११][१२][१३]

१० एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शलने फाशीची शिक्षा सुनावली. [१४][१५] १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यावरील अंतिम निर्णयासाठी आधी दिलेल्या फाशीला स्थगिती दिली. [१६] [१७] १७ जुलै २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेसाठीचे भारताचे अपील फेटाळून लावले आणि पाकिस्तानला फाशी स्थगित करण्याचे आदेश दिले. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या आणि दोषी ठरविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाकिस्तानला विचार करावा लागेल आणि भारताला समुपदेशक प्रवेश द्यावा लागेल, असे यात म्हणले आहे. [१८]

कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी यांना, त्यांना भेटण्याची परवानगी अनेक वर्षांनी देण्यात आली होती.

पार्श्वभूमी

संपादन

कुलभूषण जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे १६ एप्रिल १९७० रोजी झाला. त्यांचे वडिल सुधीर आणि आई अवंती जाधव आहेत. [][][१९] त्यांचे वडील मुंबई पोलिसांचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. [][२०]

कुलभूषण जाधव विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. [२१] त्यांचे कुटुंब मुंबईतील पवई येथे राहते. [१९][२०] पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तानुसार, कुलभूषण जाधव १९८७ मध्ये भारतीय राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये दाखल झाले आणि १९९१ मध्ये भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेत त्यांची नेमणूक झाली. [२२] २००१ च्या भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी भारतात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनीही वृत्त दिले आहे. १४ वर्षांच्या सेवेनंतर, २००३ मध्ये त्यांना गुप्तचर ऑपरेशन्समध्ये सामील करण्यात आले आणि त्यांनी इराणच्या चाबहार येथे छोटा व्यवसाय सुरू केला, तेथून त्यांनी कराची आणि बलूचिस्तानमध्ये अनेक भेटी दिल्या. [२३][२४][२५]


संदर्भ

संपादन
  1. ^ Neha Mahajan (25 March 2016). "India Says Ex-Naval Officer Arrested in Pak Is Not RAW Intel Agent". NDTV Convergence Limited. 26 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Kulbhushan Jadhav Was Under Stress; Wife And Mother Had To Change For Meeting: India". 17 July 2019 रोजी पाहिले.
  3. ^ a b Naveed Ahmad (29 March 2016). "Analysis: Kulbhushan Yadav's RAW move". The Express Tribune. 7 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 April 2016 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Swami, Praveen (12 April 2017). "Behind Kulbhushan Jadhav veil, some glimpses". The Indian Express. 15 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 April 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Syed, Baqir Sajjad (6 February 2018). "Jadhav now facing trial on terrorism, sabotage charges". Dawn. 6 February 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Syed Ali Shah (25 March 2016). "'RAW officer' arrested in Balochistan". DAWN. 26 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 March 2016 रोजी पाहिले.
  7. ^ Salman Masood (29 March 2016). "Pakistan Releases Video of Indian Officer, Saying He's a Spy". The New York Times. 30 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 March 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Kulbhushan Jadhav Kidnapped From Iran, No Evidence Against Him, Says India". NDTV.com.
  9. ^ Mateen Haider, Shakeel Qarar (25 March 2016). "India accepts 'spy' as former navy officer, denies having links". DAWN. 26 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 March 2016 रोजी पाहिले.
  10. ^ "Delhi denies arrest of 'Indian spy' in Pakistan". BBC. 30 March 2016. 31 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 March 2016 रोजी पाहिले.
  11. ^ "Press statement on video released by Pakistani authorities". 24 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  12. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Rijiju Slams Pakistan for Releasing Doctored Video on Arrested Man नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  13. ^ Revealed: 'Spy' Kulbhushan Yadav not caught but abducted by extremist Sunni group Jaishul Adil Archived 9 May 2016 at the Wayback Machine., India Today, 30 March 2016.
  14. ^ "Pakistan sentences Indian spy Kulbhushan Jadhav to death". Dawn. 11 April 2017. 11 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 April 2017 रोजी पाहिले.
  15. ^ "Former Naval Officer Kulbhushan Jadhav Sentenced To Hang in Pak". NDTV. 10 April 2017. 10 April 2017 रोजी पाहिले.
  16. ^ "Pakistan Is Ordered to Suspend Execution of Indian Convicted of Espionage". न्यू यॉर्क टाइम्स. 18 May 2017. 22 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 May 2017 रोजी पाहिले.
  17. ^ "ICJ Provincial measures" (PDF). 15 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
  18. ^ DelhiJuly 17, Prabhash K. Dutta New; July 17, 2019UPDATED:; Ist, 2019 20:17. "ICJ verdict on Kulbhushan Jadhav: What went in India's favour and against". India Today (इंग्रजी भाषेत). 2019-07-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  19. ^ a b Haider, Suhasini (8 September 2016). "Pak. summons envoy on 'spy' arrest, India rejects claims". The Hindu. 28 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 April 2017 रोजी पाहिले.
  20. ^ a b "Friends, neighbours of Kulbhushan Jadhav urge Delhi to seek his release". Hindustan Times. 10 April 2017. 14 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 April 2017 रोजी पाहिले.
  21. ^ "Kulbhushan Jadhav's death sentence: As India-Pakistan spar over Indian 'spy', questions loom large". First Post. 12 April 2017. 14 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 April 2017 रोजी पाहिले.
  22. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Geo reveals नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  23. ^ "Transcript of RAW agent Kulbhushan's confessional statement". 30 March 2016. 13 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  24. ^ "German diplomat says Yadav was caught by Taliban". The News International. 13 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  25. ^ Dawn.com (29 March 2016). "Govt airs video of Indian spy admitting involvement in Balochistan insurgency". Dawn. Pakistan. 22 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 March 2016 रोजी पाहिले.