कुरितिबा (पोर्तुगीज: Curitiba) ही ब्राझील देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझीलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय स्थान आहे.

कुरितिबा
Curitiba
ब्राझीलमधील शहर

Curitiba From Barigui Park.jpg

Bandeira de Curitiba.svg
ध्वज
Brasão de Curitiba.svg
चिन्ह
Parana Municip Curitiba.svg
कुरितिबाचे पारानामधील स्थान
कुरितिबा is located in ब्राझील
कुरितिबा
कुरितिबा
कुरितिबाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 25°25′47″S 49°16′19″W / 25.42972°S 49.27194°W / -25.42972; -49.27194

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira do Paraná.svg पाराना
स्थापना वर्ष २९ मार्च १६९३
क्षेत्रफळ ४३४.९७ चौ. किमी (१६७.९४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,०६६ फूट (९३५ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १७,४६,८९६
  - घनता ४,०१६.२ /चौ. किमी (१०,४०२ /चौ. मैल)
  - महानगर ३१,६८,९८०
www.curitiba.pr.gov.br

१९व्या शतकाच्या मध्यापासून वेगाने वाढत असलेल्या कुरितिबाला रीडर्स डायजेस्ट ह्या मासिकाने ब्राझिलमधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर असे गौरविले आहे. कुरितिबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा बायशादा ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: