कुमकुम (अभिनेत्री)

(कुमकुम या पानावरून पुनर्निर्देशित)

कुमकुम भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म झैबुनिसा,हुसेनाबाद शेखपुरा या बिहारमधील ठिकाणी १९३४ मध्ये झाला. तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे ११५ चित्रपट केलेत. मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा, गंगा की लहरे, राजा और रंक, आंखें (१९६८),हे त्यातील काही निवडक प्रसिद्ध चित्रपट आहेत. तिने आपल्या कालखंडात अनेक चित्रपट-नायकांसह भूमिका केल्यात आणि तिची किशोर कुमारच्या सोबत बजावलेली भूमिका प्रसिद्ध झाली.ती सन १९५४ ते १९७३ या कालावधीत चित्रपटसृष्टीत कार्यरत होती.

कुमकुम यांनी भोजपुरी चित्रपटांतही काम केले. 'गंगा मय्या तोहे पियारी चढैबो' (१९६३) हा तिने काम केलेला एक चित्रपट होता.