कीर्तिगा रेड्डी
कीर्तिगा रेड्डी (१९७१:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) एक भारतीय व्यावसायिक महिला आणि सॉफ्टबँकच्या १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या व्हिजन फंडातील उद्योजक भागीदार आहेत.[१][२] रेड्डी सॉफ्टबँकची पहिली महिला गुंतवणूकदार भागीदार आणि फेसबुक इंडियाची माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.[३][४][५][६][७]
किर्तीगा रेड्डी | |
---|---|
जन्म |
[[ ]], १९७१ चेन्नई, भारत |
जोडीदार | देवानंद रेड्डी |
अपत्ये | २ मुली |
रेड्डी यांना भारतातील एका विशाल समाज मध्यमाची पहिली कर्मचारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. तसेच त्या फेसबुकच्या देशातील वाढी मागील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.[८]
इ.स. २०११ मध्ये, रेड्डी 'फॉर्च्युन इंडिया'च्या सर्वोत्तम-५० सर्वात शक्तिशाली महिलांमधील एक बनल्या आणि भारताच्या २५ सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला.[९][१०][११]
वैयक्तिक जीवन
संपादनकीर्तिगा रेड्डीचा जन्म भारतातील एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. किर्तीगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र अंतर्गत महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये दुसऱ्या क्रमांकासह अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली.[१२] पदवीनंतर, त्या आपल्या पालकांसह नागपुरात स्थलांतरित झाल्या आणि नंतर अभियांत्रिकी विषयातील लेखक यशवंत कानेटकरांना त्यांच्या पुस्तकांमधील प्रोग्रामिंगच्या उदाहरणांसह मुख्य संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत केली.[१३] त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथे संगणक अभियांत्रिकीमध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आणि एम.एस. सिरॅक्यूज विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले.[१४]
तत्पश्चात कीर्तिगा रेड्डी यांनी सिलिकॉन ग्राफिक्स आणि मोटोरोला सारख्या प्रस्थापित कंपन्यांमध्ये काम केले. सिलिकॉन ग्राफिक्समध्ये त्यांच्या कार्यकाळात, त्या अभियांत्रिकीची सर्वात तरुण संचालिका होत्या आणि त्या स्तरातील तिच्या टीममधील एकमेव महिला होत्या. इ.स. २००८ मध्ये, रेड्डी भारतात परतल्या आणि त्यांनी अमेरिकेतील फिनिक्स टेक्नॉलॉजीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.[१३][१५]
जुलै २०१२ मध्ये, रेड्डी फेसबुकमध्ये सामील झाल्या.[१६][१७] भारत देशातील कंपनीची पहिली कर्मचारी म्हणून त्यांनी भारतात कामकाज सुरू केले. रेड्डी यांच्या कामाचे एव्हढे समर्पण होते की प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी ऑफिसचे शटर त्यांनी स्वतः उघडले. रेड्डींच्या नेतृत्वाखाली, फेसबुक इंडियाची वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. एवढेच नव्हे तर कोका-कोला इंडिया आणि यीपमी सारख्या प्रमुख कंपन्यांसोबत टाय-अपसह जाहिरात विक्रीद्वारे जागतिक व्यवसायात फेसबुकला महत्त्वपूर्ण योगदान लाभले.[१३]
फेसबुकने भारतातील 'फ्री बेसिक्स' योजना बंद केल्याच्या एका दिवसानंतर, रेड्डीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आणि सहा ते बारा महिन्यांत अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला.[१८][१९]
१२ फेब्रुवारी २०१६ रोजी, फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये रेड्डी लिहितात:
"जेव्हा माझे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले, तेव्हा आम्हाला माहित होते की आम्ही काही दिवसांनी अमेरिकेत परत जाणार आहोत. परंतु पुढील ६ ते १२ महिन्यांत परताव्याची वेळ येणार आहे हे सांगणे हा एक कटू क्षण आहे. आमच्या दोन मुलींनी हायस्कूल आणि माध्यमिक शिक्षण सुरू केले - जे एक नैसर्गिक संक्रमण बिंदू म्हणून काम करते, ज्यामुळे ही वाटचाल परत सुखकर होईल"
वैवाहिक जीवन
संपादनकीर्तिगा रेड्डी यांचे देवानंद रेड्डी सोबत लग्न झाले आहे. आणि या युगुलास दोन मुली आहेत - आशना आणि आरिया.[१३]
संदर्भ
संपादन- ^ "Ex-Facebook exec Kirthiga Reddy becomes first female investing partner at SoftBank's Vision Fund". TechCrunch. 7 December 2018.
- ^ "Kirthiga Reddy - Venture Partner, Americas". SoftBank Group. 11 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Ex-Facebook exec Kirthiga Reddy becomes first female investing partner at SoftBank's Vision Fund". TechCrunch. 7 December 2018.
- ^ "Kirthiga Reddy - Venture Partner, Americas". SoftBank Group. 11 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "SoftBank Partner: Fundraising 'Environment Has Changed'". Fortune magazine. 5 June 2019.
- ^ "Facebook India's managing director Kirthiga Reddy steps down". द टाइम्स ऑफ इंडिया. 12 February 2016.
- ^ "Facebook India head Kirthiga Reddy steps down". द हिंदू. 13 February 2016.
- ^ "Buying likes is not a valid business model: Kirthiga Reddy, FB India head". Economic Times. 2016-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Fortune lists women in power". telegraphindia.com. 5 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "India's 25 most influential women". India Today.
- ^ नैना लाल, किडवाई (२०१७). ३० सामर्थ्यशाली स्त्रिया. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. १४१. ISBN 978-93-86204-06-6.
- ^ "Kirthiga Reddy - LinkedIn". linkedin.com. 5 July 2016 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Creating your own choices is the way to excel in personal and professional matters". 14 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Kirthiga Reddy: The face behind Facebook- Business News". intoday.in. 5 July 2016 रोजी पाहिले.
- ^ Gunjeet Sra. "Face to face with Kirthiga Reddy". India Today. 11 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Facebook Appoints Kirthiga Reddy As Head Of Indian Operations". Medianama.com. 16 July 2010 रोजी पाहिले.
- ^ E. Kumar Sharma. "Digital diva". Business Today. 15 May 2011 रोजी पाहिले.
- ^ "Kirthiga Reddy steps down as Facebook India managing director". Firstpost. 12 February 2016 रोजी पाहिले.
- ^ "Facebook says India MD Kirthiga Reddy's US move not linked with Free Basics". The Indian Express. 14 February 2016. 5 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Facebook India head Kirthiga Reddy steps down". economictimes (इंग्रजी भाषेत). 19 September 2021 रोजी पाहिले.
- ^ "Facebook India head Kirthiga Reddy steps down". livemint (इंग्रजी भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-09-21. 2021-09-21 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)