किल्ले धारूर
कील्ले
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
किल्ले धारूर हे बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्याचे मुख्यालय आहे. किल्ले धारूर बाजारपेठ येथील सोन्याची बाजार पेठ फार पुर्वीपासुन प्रसिद्द आहे. तसेच सीताफळे व खव्याच्या निर्यातीत किल्ले धारूर अग्रेसर आहे. किल्ले धारुर येथील सराफा बाजारपेठ फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. सीताफळांसाठी धारुरचे नाव प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्यालासुद्धा येथील सीताफळांना मागणी असते. तसेच खवा उत्पादन ही येथे बऱ्याच प्रमाणात होत असते. सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी येथे आठवडी बाजार भरतो. तालुक्यातील शेतकरी भाजी-पाला, खवा, धान्य आणून येथे बाजार भरवतात. शेतमालासाठी येथे कृषी-उत्पन्न बाजार समिती असून ती शेतकऱ्यांना सेवा पुरवते.