किरीट जोशी हे एक भारतीय तत्त्वज्ञ होते. ते श्रीअरविंद आणि मीरा अल्फासा यांचे शिष्य होते. १९७६ मध्ये, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किरीट यांची भारत सरकारचे शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. [१]

किरीट जोशी
जन्म १० ऑगस्ट १९३१ (1931-08-10)
भारत
मृत्यू १४ सप्टेंबर २०१४
प्रशिक्षणसंस्था मुंबई विद्यापीठ
प्रसिद्ध कामे २००८-२०१० या कालावधीत गुजराथच्या मुख्यमंत्र्यांचे शैक्षणिक सल्लागार व अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
ख्याती योग, तत्त्वज्ञान, शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण
संकेतस्थळ
https://www.kireetjoshiarchives.com/

जीवन व कार्य संपादन

किरीट जोशी यांचा जन्म १० ऑगस्ट १९३१ रोजी झाला. त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये तत्त्वज्ञान आणि कायद्याचे शिक्षण घेतले. १९५५ मध्ये त्यांची IAS साठी निवड झाली परंतु श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या पूर्णयोगाचा अभ्यास केल्यावर आपले समग्र जीवन त्याच्या अभ्यासासाठी आणि साधनेसाठी समर्पित करण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यानुसार त्यांनी १९५६ मध्ये सुरतच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला.

पाँडिचेरी येथील 'श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन'मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र शिकवले आणि श्रीमाताजींच्या थेट मार्गदर्शनाखाली असंख्य शैक्षणिक प्रयोगांमध्ये भाग घेतला.

१९७६ मध्ये, भारत सरकारने त्यांना शिक्षण मंत्रालयात शैक्षणिक सल्लागार म्हणून आमंत्रित केले. १९८३ मध्ये त्यांना भारत सरकारचे विशेष सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आणि १९८८ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले.

१९८१ ते १९९० या काळात ते (इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च) भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषदेचे सदस्य-सचिव होते.

१९८७ ते १९९३ या काळात ते राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानचे सदस्य-सचिव होते. १९८७ ते १९८९ या काळात ते हॅम्बर्ग येथील युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष होते.

१९९९ते २००४ पर्यंत ते ऑरोविल फाउंडेशनचे अध्यक्ष होते. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी गुजरात राज्यात बालकांचे विद्यापीठ आणि शिक्षक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास मदत केली.

२००० ते २००६ पर्यंत ते इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचे अध्यक्ष होते.

२००६ ते २००८ पर्यंत, ते (प्रोजेक्ट ऑफ हिस्ट्री ऑफ इंडियन सायन्स, फिलॉसॉफी अँड कल्चर) भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीच्या (PHISPC) इतिहासाच्या प्रकल्पाचे संपादकीय फेलो होते. १४ सप्टेंबर २०१४ रोजी पुद्दुचेरी येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भग्रंथ संपादन

योग आणि संबंधित विषयांचे संश्लेषण संपादन

  • श्रीअरबिंदो आणि द मदर, आयएसबीएन 81-208-0655-7

तत्त्वज्ञानावरील पुस्तके संपादन

  • अ फिलॉसॉफी ऑफ द रोल ऑफ कंटेम्पररी टीचर
  • अ फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन फॉर द कंटेम्पररी युथ
  • अ फिलॉसॉफी ऑफ इव्होल्युशन फॉर  द कंटेम्पररी मॅन
  • फिलॉसॉफी अँड योगा ऑफ श्रीऑरोबिंदो अँड अदर एसेज
  • फिलॉसॉफी ऑफ व्हॅल्यू-ओरिएंटेड एज्युकेशन थियरी अँड प्रॅक्टिस   
  • फिलॉसॉफी ऑफ सुपरमाइंड अँड कंटेम्पररी  क्रायसिस 
  • ऑन मटेरिअलिझम
  • टोवर्डस्‌ युनिव्हर्सल फ्रॅटर्निटी
  • टोवर्डस्‌ अ न्यू सोशल ऑर्डर

भारतीय संस्कृती संपादन

  • वेद आणि भारतीय संस्कृती

शिक्षण संपादन

  • एज्युकेशन ऍट क्रॉसरोडस्‌   

शिक्षक प्रशिक्षणासाठी अध्यापन सामग्री संपादन

  • द एम ऑफ लाईफ
  • द गुड टिचर अँड द गुड प्युपिल 
  • मिस्टरी अँड एक्सलन्स ऑफ द ह्युमन बॉडी 

तेजोमयता, वीरता आणि सुसंवाद या संकल्पनेशी संबंधित मोनोग्राफ संपादन

• पार्वतीची तपस्या • नचिकेत

भाषणे, व्याख्याने आणि व्हिडिओ संपादन

  • अ न्यू सिंथेसिस ऑफ योगा अज अ नेसेसिटी टू ओव्हरकम द इंपास ऑफ मॉडर्निटी - स्काईप

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन