किनवट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. गोंड, प्रधान, फासे पारधी या आदिवासी जमाती बरोबर या भागात लमान, गोरमाटी, बंजारा या विमुक्त जाती देखील आढळतात. या भागात लमानांचे तांडे, आदिवासी गोंडांची खेडी, इतर समाजाचे छोटे गाव व वाडीमध्ये, नदी किनाऱ्यालगत पूर, अश्या गावांमध्ये लोकजीवन वसलेले आहे, किनवट-माहूर असे एकत्र नावाने उच्चार होत असलातरी किनवट व माहूर ही वेगवेगळी तालुके आहेत.

  ?किनवट
‍ किनवट
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: किनवट
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा नांदेड नांदेड
भाषा मराठी
तहसील किनवट
पंचायत समिती किनवट
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431804
• ++०२४६२
• MH26

लोकजीवन

संपादन

किनवट तालुक्यात बरेचशी लहानमोठी गावे येतात. ग्रामीण भागात अत्यल्प सेवा व सुविधा तसेच दळणवळण, पाणी, विद्युत, इत्यादी सारख्या मूलभूत सेवांपासून वंचीत असलेल्या भागात कर्मचारी व अधिकारी वर्ग नाखुश असल्यामूळे या नक्षलग्रस्त तालुक्यात एक स्तर या प्रकारातील जादा वेतन देण्यात येते. किनवट पासून वायव्येकडे माहूर हे देवस्थान चाळीस ते पंचेचाळीस कि.मी. अंतरावर येते. या भागात अवेळी होणारा पाऊस, वादळ वारे, व गारपीट मूळे पीकांचे फार नुकसान होत असल्यामूळे येथील शेतकरी नेहमीच नव-नवीन पीकांचे उत्पादन घेण्यासाठी असंतोष दर्शवितात. दळणवळणाचे सोयी अभावी पीकांचे उत्पादन घेणे व बाजारपेठेपर्यंत शेतमाल पोहचवणे फार कठीण जाते. कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद इत्यादी कोरडवाहू, जिरायत पीके घेतली जातात. काही बारमाही बागायत क्षेत्रात केळी, उस, हळद, भूई मूग इत्यादी सारखी पीकांचे उत्पादन केले जाते. शहराचे लगतचे दहा ते बारा कि.मी.अंतरावर दुग्ध विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच कोरडवाहू पीक क्षेत्रात गाई-म्हशी, शेळी पालन केले जाते. विरंगुळयाचे साधने म्हणून या परीसरात वेगवेगळया ग्रामदेवतांच्या यात्रा, खेळ, सामने, टोरनामेंट, (श्रावणातील यात्रा) भरविल्या जातात.

पार्श्वभूमी

संपादन

किनवट हा महाराष्ट्रातील आदिवासी बाहुल्य असलेला नांदेड जिल्ह्यातील तालुका आहे. तसेच पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा हा किनवट तालुक्यात आहे. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर हा तालुका वसलेला आहे.

या भागातील जंगल खूप प्रसिद्ध असून, मराठवाडाविदर्भ या प्रादेशिक विभागाला विलग करणाऱ्या पैनगंगा नदीच्या तीरावर छान असे किनवट -टीटवाळा पक्षी अभयारण्य आहे. येथील जंगलात साग जातीचे झाडे प्रसिद्ध आहेत. पानझडीच्या वृक्षांमुळे येथे उन्हाळ्यात सतत लागणारे वणवे, त्यामुळे खूप जंगलातील झाडे कमी हाेत आहेत. येथून चाळीस किमी अंतरावर माहूरगड आहे.

भौगोलिक स्थान

संपादन

सह्याद्री पर्वतरांगांच्या उपडोंगर अजिंठा पर्वतरांगा या भागात येऊन पठारात मिसळतात.या भागात मान्सूनचे पूर्व व पश्चिम या दोन्ही वा-यांमूळे पर्जन्यवृष्टी होते. परंतु बेसाल्ट खडक, जमिनीत असलेल्या खडकाळ भागामूळे भूजल साठा कमी आढळतो, डोंगराळ भागामूळे पाणी जलद गतीने वाहून नदी, ओहोळ, नाल्यास प्राप्त झाल्यामूळे भूगर्भात पाणी मुरण्यासाठी अवधी प्राप्त होत नसल्यामूळे सतत पाण्याचे दुर्भिक्ष्य असते.

हवामान

संपादन

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

माहूरकडे जाणारा डोंगर घाट, किनवट मांडवी रोडवरील अंबाडी घाट

, राराजगड येथील बंद पडलेले विमानतळ, जलधरा येथील जंगल, डोंगर, व भरण्यात येणारी यात्रा, लकडकोट - मारेगाव या भागातील पीसाईचा डोह, मोहपूर येथील डॅम, शिवमंदीर रायपुर तांडा येथील नवसाला पावनारा हनुमान जी मंद, श्री राम मंदिर पाचोंदा, श्री राम खोरे , ऊनकेश्वर, िर

नागरी सुविधा

संपादन

जवळपासचे तालुके

संपादन
  • पूर्वेस - आदिलाबाद (तेलंगाणा)
  • पश्चिमेस - उंबरखेड (विदर्भ), माहूर,
  • दक्षिणेस - हिमायतनगर,
  • उत्तरेस - घाटंजी, पांढरकवडा (विदर्भ)

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आमडी (किनवट)
  2. अमळापूर
  3. अंबाडी (किनवट)
  4. आंध बोरी
  5. अंजी (किनवट)
  6. आप्पारावपेठ
  7. बेलोरी (किनवट)
  8. बेंदी
  9. बेंदी तांडा
  10. भंडारवाडी (किनवट)
  11. भिकु नाईक तांडा
  12. भिलगाव
  13. भिमपूर
  14. भिसी
  15. भुलजा
  16. बोधडी बुद्रुक
  17. बोधडी खुर्द
  18. बोथ (किनवट)
  19. बुधवारपेठ
  20. बुरकुलवाडी
  21. चंद्रपूर (किनवट)
  22. चपला नाईक तांडा
  23. चिखली तांडा
  24. चिखली (किनवट)
  25. चिंचखेड (किनवट)
  26. छोटी चिखली
  27. च्यास
  28. दयाळधानोरातांडा
  29. दाभाडी (किनवट)
  30. दगडवझरा
  31. दहेगाव (किनवट)
  32. दहेली
  33. धामनधरी
  34. दरसांगवी
  35. दरसांगवी
  36. दयाळधानोरा
  37. दिपा नाईक तांडा
  38. देवळा तांडा
  39. धानोरा (किनवट)
  40. धावजी नाईक तांडा
  41. दिगडी
  42. दिग्रस (किनवट)
  43. डोंगरगाव (किनवट)
  44. डोंगरगाव तांडा
  45. दुंदरा
  46. गणेशपूर (किनवट)
  47. गौरी (किनवट)
  48. घोगरवाडी
  49. घोटी (किनवट)
  50. गोकुंदा
  51. गोंडमहागाव
  52. गोंडजेवली
  53. गोंड जेवली तांडा
  54. हातोळा (किनवट)
  55. हुडी
  56. इंजेगाव
  57. इरेगाव
  58. इस्लापूर
  59. जलधरा
  60. जलधरा तांडा
  61. जारोडातांडा
  62. जारूर (किनवट)
  63. जारूरतांडा
  64. जवरळा
  65. जुनोणी (किनवट)
  66. कामठाला
  67. कणकीतांडा
  68. कनकवाडी
  69. कांचळी
  70. कणकी
  71. करंजी (किनवट)
  72. कार्ला (किनवट)
  73. खंबाळा (किनवट)
  74. खेरडा (किनवट)
  75. कोठारी
  76. कोपरा (किनवट)
  77. कोसमेट
  78. कोठारी (किनवट)
  79. कोठारी सिंदखेड
  80. कुपटी बुद्रुक
  81. कुपटी खुर्द
  82. लालुनाईकतांडा
  83. लिंगधारी
  84. लिंगी (किनवट)
  85. लोखंडवाडी
  86. लोणी (किनवट)
  87. मदनापूर
  88. मलकवाडी
  89. माळबोरगाव
  90. मलकजाम
  91. मलकजामतांडा
  92. माळकोल्हारी
  93. मांडवा (किनवट)
  94. मांडवी (किनवट)
  95. मानसिंगतांडा (किनवट)
  96. मारेगाव
  97. मारेगाव वरचे
  98. मारलागुडा
  99. मथुरातांडा
  100. मिणकी (किनवट)
  101. मोहाडातांडा
  102. मोहपूर
  103. मुळझरा
  104. नागापूर (किनवट)
  105. नागझरी (किनवट)
  106. नखातेवाडी
  107. नंदगाव (किनवट)
  108. नंदगाव तांडा
  109. नवाखेडा
  110. नवरगाव (किनवट)
  111. निचपूर
  112. निराळा
  113. निराळातांडा
  114. पळशी (किनवट)
  115. पळशीतांडा
  116. पांढरा (किनवट)
  117. पंगारपहाड
  118. पंगारीतांडा
  119. पांगरी (किनवट)
  120. परसराम नाईक तांडा
  121. पारडी (किनवट)
  122. पारडी बुद्रुक
  123. पारडी खुर्द
  124. परोठी
  125. परोटी तांडा
  126. पठारी
  127. पाटोदा (किनवट)
  128. पाटोदा बुद्रुक (किनवट)
  129. पेंदा
  130. फुलेनगर (किनवट)
  131. पिंपळशेंडा (किनवट)
  132. पिंपळगाव (किनवट)
  133. पिंपरफोडी
  134. पिंपरी (किनवट)
  135. पोत्रेडी
  136. प्रधानसांगवी
  137. राजगड (किनवट)
  138. राजगडतांडा
  139. रामजी नाईक तांडा
  140. रामपूर (किनवट)
  141. रायपूरतांडा
  142. रिठा (किनवट)
  143. रिठातांडा
  144. रोडा नाईक तांडा
  145. साकळु नाईक तांडा
  146. सळईगुडा
  147. संगवी
  148. सारखणी
  149. सावरगाव (किनवट)
  150. सावरी (किनवट)
  151. शनिवारपेठ
  152. शिवणी (किनवट)
  153. शिवनी (किनवट)
  154. सिंदगी (किनवट)
  155. सिंगारवाडी (किनवट)
  156. सिंगोडा (किनवट)
  157. सिरमेटी
  158. सिरपूर (किनवट)
  159. सोनपेठ (किनवट)
  160. सोनवाडी (किनवट)
  161. सोवारगावतांडा
  162. सुंगागुडा
  163. तळईगुडा
  164. तळ्ळारी
  165. तळ्ळारीतांडा
  166. टेंभी (किनवट)
  167. टेंबीतांडा
  168. थारा
  169. टिटवी (किनवट)
  170. तोतंबा
  171. उमरी (किनवट)
  172. उणकदेव
  173. वझरा बुद्रुक
  174. व्यंकटराम नाईक तांडा
  175. वडोळी (किनवट)
  176. वाळकी बुद्रुक (किनवट)
  177. वाळकी खुर्द (किनवट)
  178. येंदा
  179. झळकवाडी
  180. झेंडीगुडा

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका