काशीबाई बदनापूरकर ही नारायण सूर्याजी ठोसर याची वाग्दत्त वधू होती. नारायणाने ऐन लग्नमुहूर्ताच्या वेळी लग्न मंडपातून पलायन केले. त्यामुळे तिचे त्याच्याशी लग्न होऊ शकले नाही. हाच नारायण पुढे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध झाला. अनंत गोपाळ कुडाळकर यांच्या वाकेनिशीत काशीबाईचा वृत्तान्त आला आहे.[ संदर्भ हवा ]

नारायणाचे पलायन आणि साखाजीशी विवाह संपादन

काशीबाई बदनापूरकर ही नागुजी बदनापूरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायण सूर्याजी ठोसर याचा सख्खा मामा होता. नारायण पळून गेल्यामुळे काशीबाईचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा, गाव सोमवाडी, ता. अंबड, जि. जालना येथील साखाजी मिनधर नावाच्या एका तरुणाने काशीबाईशी विवाह करण्याची तयारी दर्शविली. साखाजी हा जातीने मराठा होता. साखाजीच्या घरात देशमुखी होती. [[नारायण सूर्याजी ठोसर[[ उर्फ रामदास यांचा मोठा भाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनी काशीबाई आणि साखाजीच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. काशीबाई हिचे वडील नागुजी बदनापूरकर यांचे मन त्यांनी वळविले. नागुजींच्या अनुमतीने काशीबाईचा विवाह साखाजी मिनधर याच्याशी लावून देण्यात आला. कन्यादान गंगाधरपंतांनीच केले. साखाजी मिनधर आणि काशीबाई बदनापूरकर यांचा विवाह हा महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातील पहिला आंतरजातीय विवाह आहे. [१][ संदर्भ हवा ]

आत्महत्या संपादन

साखाजी मिनधर आणि काशीबाई बदनापूरकर यांचा आंतरजातीय विवाह यशस्वी होऊ शकला नाही. विवाहानंतर थोड्याच दिवसांत काशीबाई हिने अंबड येथील एका बारवेत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबडमधील ही बारव आजही सती काशीची बारव या नावानेच ओळखली जाते. काशीबाईने आत्महत्या का केली, याबाबत अनेक कारणे सांगितली जातात. ब्राह्मणेतर पुरुषाशी विवाह करणे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात ठसविण्यात आल्यामुळे तिने आत्महत्या केली, असे काही इतिहासकार मानतात. साखाजीसोबतचा विवाह काशीबाईलाच मान्य नव्हता, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असाही एक मतप्रवाह आहे.[ संदर्भ हवा ]


संदर्भ संपादन

  1. ^ अनंत गोपाळ कुडाळकर लिखित वाकेनिशी

बाह्य दुवे संपादन