काळा कस्तूर
काळा कस्तूर किंवा ज्याला कस्तुरी, गायकवाड, सालई, सफेद साळुंखी, सालभोरडा किंवा साळोखी (इंग्लिश:Indian Blackbird) अशा अनेक नावांनी ओळखतात, एक पक्षी आहे.
हा पक्षी मध्यम आकाराच्या मैनेएवढा असतो. याची चोच पिवळी असून रंग संपूर्ण काळा असतो. मादीचा कंठ काळ्या रेषा असलेला पिवळट तपकिरी वर्णाचा असतो आणि चोच काळी असते.
वितरण
संपादनहा पक्षी फक्त भारत आणि श्रीलंकेत आढळतो व कमी अंतरावर स्थलांतर करतो. भारतात दक्षिण राजस्थान, पूर्व गुजरात , पूर्वेकडे पश्चिम विंध्य रांगा व सातपुड्यात ते शिवनीपर्यंत, केरळ मधील संलग्न डोंगराच्या रांगा व तामिळनाडू या भागात ते हिवाळी पाहुणे असतात. जून ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा काळ असतो.
निवासस्थाने
संपादनहे पक्षी पानगळीची जंगले व सदाहरितपर्णी वनांमध्ये राहतात. यांची एक प्रजात पश्चिम घाटामध्ये २००० मी उंचीपर्यंत वास्तव्य करते.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली