कार्ल बायर (मार्च ४, १८४७ - ऑक्टोबर ४, १९०४) हा ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने बॉक्साइटापासून ऍल्युमिना वेगळे काढण्याची बायर प्रक्रिया निर्मिली. खनिजापासून ऍल्युमिनियम धातूचे औद्योगिक उत्पादन करण्याकरता बायर प्रक्रिया आजतागायत वापरली जाते.

कार्ल बायर
जन्म मार्च ४, १८४७
मृत्यू ऑक्टोबर ४, १९०४
निवासस्थान ऑस्ट्रिया Flag of Austria.svg
कार्यक्षेत्र रसायनशास्त्र, धातुशास्त्र
ख्याती बायर प्रक्रिया