कामगार चळवळ
मुख्य कामगार चळवळ १९०० ते १९२० या काळात अस्तित्वात आल्या. नंतर भारतात कापडगिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले.या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. पुढे त्यांच्या समस्या वाढल्या.या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये " ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस " स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली.१९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता.१९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कुमकुवत झाली. जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.
संदर्भ
संपादन- ^ Movement
- ^ Labor movement
- ^ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
- ^ कापड गिरणी