कापडणे

महाराष्ट्रातील एक गाव

कापडणे हे गाव महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्याच्या धुळे तालुक्यातील आहे. भात नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कापडणे हे धुळे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.क्रांतिकारकांचे गाव अर्थात क्रांतिभूमी अशी गावाची ओळख आहे. आजही गावातील अनेक तरुण सैन्यदलात व पोलीस दलात देशसेवा बजावत आहेत.

  ?कापडणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२१° ०१′ ५५.९१″ N, ७४° ४८′ २६.७८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा धुळे
लोकसंख्या ११,६९४ (२००१)
विधानसभा मतदारसंघ धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 424307
• +०२५६२
• MH-१८ (धुळे)
संकेतस्थळ: [१]

स्थान

संपादन

कापडणे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ जवळ स्थित आहे.

लोकसंख्या

संपादन

२००१ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ११६९४ असुन, ५९५७ पुरुष आणि ५७३७ स्त्रिया आहेत.

परिवहन

संपादन

रेल्वे

संपादन

धुळे रेल्वे स्थानक हे १५ किमीवर असलेले नजीकचे रेल्वे स्थानक आहे.

प्रस्तावित धुळे-नरडाणा रेल्वेमार्ग अंतर्गत कापडणे गावासाठी रेल्वेस्थानक नियोजित आहे.

याद्वारे कापडणे गाव रेल्वेने जोडले जाऊन परिसराच्या विकासाला गती मिळणे अपेक्षित आहे.

रस्ते

संपादन

देवभाने आणि धुळे जाण्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस, खाजगी रिक्षा व जीप ही वाहने आहेत.

धुळे विमानतळ गावासाठी नजीकचे विमानतळ आहे.