कशेळी (राजापूर)

(कशेळी(राजापूर) या पानावरून पुनर्निर्देशित)

कशेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?कशेळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५३
• एमएच/08०८

भौगोलिक स्थान

संपादन

[] रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रत्‍नागिरीच्या दिशेने शेवटचे गाव म्हणजे "कशेळी". रत्‍नागिरी पासून ३३ किमी आणि राजापूर पासून ३४ किमी वर आहे.

हवामान

संपादन

इतर कोकण प्रमाणे पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि थंडीत खूप थंडी असते. उन्हाळ्यात उष्ण व कोरडे हवामान असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

१) श्री कनकादित्य मंदिर- कशेळी बांध पासून आत ३ किमी अंतरावर प्रसिद्ध "श्री. कनकादित्य मंदिर" आहे. हे एक सूर्यमंदिर आहे. मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी काही सूर्य पूजकांनी गुजरात मधील "वेरावळ" येथून सूर्यनारायणाच्या काळ्या पाषाणाच्या मुर्त्या एका जहाजात ठेवून दक्षिणेला "विजयनगर हिंदू साम्राज्य"च्या दिशेला नेण्यात येत होत्या. कशेळीच्या किनाऱ्याकडून जात असताना अचानक जहाज जागेवरच थांबले. ते कितीही केल्या जागचे हलेच ना. जहाजातील सूर्य पूजकांनी हा देवाची इच्छा समजून सूर्यमूर्त्यांपैकी एक मूर्ती किनाऱ्यावरील एका नैसर्गिक गुहेत ठेवली. असे करताच एकाएक जहाज चालू लागले. त्यानंतर कशेळी गावातील "कनका" नामक ब्राह्मण स्त्री मोठी सूर्यभक्त होती. तिच्या स्वप्नात सूर्यनारायण येऊन "मी कशेळी गावच्या किनाऱ्यावर एका समुद्री गुहेत आलो आहे. तू मला येथून घेऊन जाऊन मला गावात आसनस्थ कर.." असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कनकाने घडलेले स्वप्न गावकऱ्यांना सांगितले. या स्वप्नाप्रमाणे गावकऱ्यांनी किनाऱ्यावर शोध घेऊन मूर्ती गावात आणली व मंदिर उभे करून त्यात स्थापना केली. कनकाच्या नावावरून त्यास "श्री. कनकादित्य" हे नामकरण झाले.

मंदिर परिसर प्रशस्थ आहे. इतर कोकणी मंदिरांप्रमाणे ह्या मंदिराचे देखील चिरेबंदी बांधकाम आहे. मंदिराच्या आवारात एक विहीर असून त्यातील पाण्याने पाय धुऊनच मंदिरात प्रवेश करावा. मंदिरात गाभाऱ्यात समोरच श्री कनकादित्याची उभी मूर्ती दिसते. समोरच देवाची पालखी बांधण्यात आली आहे. माघ महिन्यात "रथसप्तमी"ला पाच दिवस देवाचा उत्सव असतो. शेजारील वेत्ये- कोंभे गावातील "श्री. कालिका देवी" बरोबर श्री. कनकादित्याचा विवाह लावला जातो. "श्री.कालिका-कनकादित्य" हे या उत्सव काळातच एकत्र दिसतात त्याखेरीज ते एकत्र दिसत नाहीत. मंदिराचे सभामंडप अत्यंत सुबक असून पताक्यांची आकर्षक सजावट केलेली आहे. मंदिर आवारात "शिव शंकरा"चे कौलारू मंदिर आहे. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला "रंगमंच" आहे.

राजापूर मधील इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करण्याच्या वेळी "छत्रपती शिवाजी महाराज" यांनी मंदिराला भेट दिल्याचा ताम्रपट आहे. पुजाऱ्याकडे चौकशी केली असता ती पाहण्यास मिळू शकेल.

२) देवघळी बीच (किनारा)- ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात. येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे. तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.

३) श्री. जाकादेवी मंदिर- श्री. कनकादित्य मंदिराच्या आधी श्री. जाकादेवी मंदिर लागते. मंदिराचे बांधकाम चिरेबंदी असून समोर "दीपमाळ" आहे. शेजारी सभामंडप असून येथे लग्न, साखरपुढे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. श्री. जाकादेवी ही श्री. कालिका देवीची बहीण आहे, अशी मान्यता आहे. जाकादेवी लग्नासाठी उपवर झाल्यावर तिला स्थळ शोधण्यासाठी श्री. कालिका देवी शेजारील कशेळी गावात आली असता तिला श्री. कनकादित्य दिसले. मुलगा सुंदर दिसल्याने त्याच्यावर भाळून कालिकादेवीने स्वतःच त्याच्याबरो लग्न केले. जेव्हा जाकादेवी बहिणीचा शोध घेता घेता या ठिकाणी आली असता तिला ही माहिती कळताच ती बहिणीवर खूप रागावते. आणि बहिणीबरो बोलेनाशी होते.

        पूर्वी ज्यावेळी श्री. कालिकादेवीची पालखी श्री. कनकादित्य बरोबर विवाहास येत असे, त्यावेळी मंदिरासमोर पालखी येताच श्री. जाकादेवी मंदिराचे दरवाजे आपोआप बंद होत असे आणि पालखी पुढे जाताच दरवाजे खुले होत. आताही ही रूढ देवळाच्या गुरवाकरवी पाळण्यात येते.

४) श्री. आगवादेवी मंदिर- कशेळी बांधपासून ४ किमी अंतरावर आगवेकरवाडी येथे श्री. आगवादेवी मंदिर आहे. मंदिर साधे असून चिरेबंदी आहे. मंदिरात मूर्ती नसून एक काळा पाषाण आहे. पाषाणाला भेग गेल्यासारखी भासते. देवी खूप कडक असून महाकालीचे एक रूप समजण्यात येते. मंदिर खूप आत असून जवळच एक नैसर्गिक पर्ह्या आहे. पावसाळ्यात पर्ह्याला खूप पाणी असते.

कातळ खोदशिल्प

संपादन

येथील कातळ खोदशिल्पे हौशी पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत ह्यांनी उजेडात आणली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.येथील कातळ शिल्प जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.[]

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

१) जिल्हा:- रत्‍नागिरी- ३३ किमी

२) तालुका:- राजापूर- ३४ किमी

३) आडिवरे गाव- ५ किमी

४) गावखडी गाव- ७ किमी

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

  1. ^ "Gmail". accounts.google.com. 2021-01-28 रोजी पाहिले.
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४.