२०११ च्या जनगणनेनुसार करडी गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५३६८८४ आहे. करडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय मोहाडी (तहसीलदार कार्यालय) पासून २८ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय भंडारा पासून २८ किमी अंतरावर आहे.[]

  ?करडी (भंडारा)
Kardi
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर तुमसर, भंडारा
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा जिल्हा
तालुका/के मोहाडी
भाषा मराठी
प्रथम सरपंच
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ तुमसर-मोहाडी
शासकीय संघटना ग्रामपंचायत कार्यालय, करडी
पोलिस ठाणे हद्द करडी
न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय, मोहाडी
जिल्हा परिषद क्षेत्र करडी
पंचायत समिति क्षेत्र करडी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१९१२
• +०७१९७
• एम एच-३६

गावाचे क्षेत्रफळ सुमारे ११७६.३ हेक्टर आहे. करडीची एकूण लोकसंख्या ४,६८४ लोकसंख्या आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या २,३६४ आहे तर महिलांची लोकसंख्या २,३२० आहे. करडी गावाचा साक्षरता दर ७७.५२% असून त्यापैकी ८२.५७% पुरुष आणि ७२.३७% महिला साक्षर आहेत. करडी गावात सुमारे १,११३ घरे आहेत.[]

प्रशासनाचा विचार केला तर करडी गावाचा कारभार सरपंचाकडून केला जातो जो स्थानिक निवडणुकांद्वारे गावाचा प्रतिनिधी निवडला जातो. २०१९ च्या आकडेवारीनुसार, करडी गाव तुमसर विधानसभा मतदारसंघ आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. तुमसर हे सर्व प्रमुख आर्थिक उपक्रमांसाठी करडी पासून जवळचे शहर आहे, जे अंदाजे १८ किमी अंतरावर आहे.[]

धुळवडीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास करडी गावात शेकडो वर्षापासूनची गरदेव यात्रेची परंपरा जोपासली जाते.[]

गरदेव यात्रा

संपादन
 
गरदेव यात्रा करडी[]

होळीच्या पाडव्याला विविध रंगाची उधळण करून धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणानिमित्त देशातील व राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परंपराही पहावयास मिळतात. अशाच प्रकारच्या काही परंपरा भंडारा जिल्ह्यातही पहावयास मिळतात. यातील एक परंपरा म्हणजे मोहाडी तालुक्यातील करडी येथील गरदेव यात्रा होय.

तुमसर-साकोली राज्यमार्गावर करडी पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेले गरदेव धुलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या यात्रे करिता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत एक छोटेसे पटांगण आहे. या पटांगणामध्ये एक उभा खांब व त्याला पंचेचाळीस अंश टेकून ठेवलेला एक खांब आहे. आधी हे खांब लाकडाचे होते. पण कालांतराने करडी ग्रामपंचायतीच्या मदतीने या खांबांना सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने तयार करण्यात आले. पण परंपरा मात्र तीच कायम आहे. आधी या खांबांच्या वर एक जण अडचणीत बसू शकेल एवढी जागा होती. या खाली एक छोटेसे गरदेवाचे मंदिर आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गर पूजनाच्या परंपरे नुसार येथील सद्याचे पुजारी हरिराम महादेव चचिरे हे त्यांच्या पूर्वजांच्या परंपरेने दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी असलेले त्यांचे कुलदैवत गराच्या ठिकाणी घेऊन आणून पूजा करतात. नंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा एक प्रतिनिधी एक मोठा दोर व आळा (उभ्या खांबावर लावण्यात येणार लाकडी खांब) घेऊन पुजाऱ्यांच्या स्वाधीन करतो. पुजारी त्यांची पूजा करून गर प्रारंभ करतात. मोठ्या संख्येने याठिकाणी परिसरातील मंडळी आल्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. नागरिकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने ग्रामवासी इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. जसे की राष्ट्रीय संगीत खडा तमाशा, दंडार, संगीत नाटक.[][][][]

 
गरावर चढलेले भक्त

दोन खांबांवर आळा बांधल्यानंतर त्याला एक मोठा दूर बांधला जातो. या दोराला दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने हवेत झोके घेतात. हा एक खेळाच्या प्रकार असल्याचे सांगितले जाते. हा खेळ जरी जीवावर बेतणारा असला तरी श्रद्धेपोटी जत्रेत येणारे अनेक भाविक हा खेळ खेळतात. विशेषतः तरुण मुलांमध्ये याच्या आकर्षण मोठ्या प्रमाणात असते. या यात्रेत परिसरातील निलज बु., मोहगाव, देव्हाडा बु., नरसिंह टोला, निलज खुर्द, नवेगाव बु., मुंढरी खुर्द, मुंढरी बु., पांजरा, पालोरा, जांभळापाणी, मनोरा, पांजरा, पालोरा व इतर गावातील नागरिक उपस्थित राहतात.

छायाचित्र दालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ a b c "Kardi Village in Mohadi (Bhandara) Maharashtra | villageinfo.in". villageinfo.in. 2022-12-25 रोजी पाहिले.
  2. ^ author/admin (2017-03-15). "गरदेव यात्रा :". Lokmat. 2022-12-28 रोजी पाहिले.
  3. ^ Marathi, TV9 (2022-03-19). "'भक्तीचा महासागर' भंडाऱ्यातील 150 वर्षे जुनी गरदेव यात्रा उत्साहात साजरी". TV9 Marathi. 2022-12-28 रोजी पाहिले.
  4. ^ Marathi, TV9 (2022-03-19). "'भक्तीचा महासागर' भंडाऱ्यातील 150 वर्षे जुनी गरदेव यात्रा उत्साहात साजरी". TV9 Marathi. 2022-12-28 रोजी पाहिले.
  5. ^ "भंडाऱ्यातील १५० वर्षे जुनी गरदेव यात्रा उत्साहात साजरी". Crime India News (इंग्रजी भाषेत). 2022-12-28 रोजी पाहिले.
  6. ^ author/admin (2017-03-15). "गरदेव यात्रा :". Lokmat. 2022-12-28 रोजी पाहिले.
  7. ^
    १५० वर्षांची परंपरा जोपासणारी गरदेव यात्रा करडी येथे दरवर्षी आयोजन; कोरोना संकटामुळे स्थगिती सकाळ वृत्तसेवा निलज बु ता. २८ होळीच्या पाडव्याला विविध रंगाची उधळण करून धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणानिमित्त देशातील व राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परंपराही पहावयास मिळतात. अशाच प्रकारच्या काही परंपरा आपल्या जिल्ह्यातही पहावयास मिळतात. यातील एक परंपरा म्हणजे जवळच्या करडी येथील गरदेव यात्रा होय. तुमसर- साकोली राज्यमार्गावर करडी पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेले गरदेव येथे धूलिवंदनाच्या दिवशी भरणाऱ्या यात्रेकरिता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत एक छोटेसे पटांगण आहे. या पटांगणामध्ये एक उभा खांब व त्याला पंचेचाळीस अंश टेकून ठेवलेला एक खांब आहे. आधी हे खांब लाकडाचे होते. पण कालांतराने करडी ग्रामपंचायतीच्या मदतीने या खांबांना सिमेंट काँक्रिटच्या साहाय्याने तयार करण्यात आले. तरी परंपरा मात्र तीच कायम आहे. आधी या खांबांच्या वर एक जण अडचणीत बसू शकेल एवढी जागा होती. या खाली एक छोटेसे गरदेवाचे मंदिर आहे. धूलिवंदनाच्या दिवशी गर पूजनाच्या परंपरे नुसार येथील सध्याचे पुजारी हरिनाम महादेव चाचीरे पूर्वजांच्या परंपरेने दुपारच्या सुमारास घरी असलेले कुलदैवत गराच्या ठिकाणी आणून पूजा करतात. नंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा एक प्रतिनिधी एक मोठा दोर व आळा (उभ्या खांबावर लावण्यात येणार लाकडी खांब) घेऊन पूजाऱ्यांच्या स्वाधीन करतो. पुजारी त्यांची पूजा करून गर प्रारंभ करतात. याठिकाणी परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने आल्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. नागरिकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने ग्रामवासी इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. यात राष्ट्रीय संगीत खड़ा तमाशा, दंडार, संगीत नाटक आदींचा समावेश असतो. यात्रेत विविध वापराच्या वस्तू आणि मुलांसाठी खेळण्यांची दुकान लागतात. यावर्षी कोरोना संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. खेळ व श्रद्धा यांचा एकत्रित मेळ दोन खांबांवर आळा बांधल्यानंतर त्याला एक मोठा दूर बांधला जातो. या दोराला दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने हवेत झोके घेतात. हा एक खेळाच्या प्रकार असल्याचे सांगितले जाते. मात्र, खेळ जिवावर बेतणारा असला तरी, श्रद्धेपोटी जत्रेत येणारे अनेक भाविक यात सहभागी होतात. विशेषतः तरुण मुलांमध्ये याचे मोठे आकर्षण असते. यावर्षी कोरोनामुळे लोकांना या ठिकाणी येण्याची परवानगी नसली, तरी मी माझ्या पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करीन. मी माझ्या परंपरेत खंड पडू देणार नाही. - हरिनाम महादेव चाचीरे पुजारी, करडी. दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार होणारी गरदेवाचे पूजा होईल. परंतु, या ठिकाणी कुणालाही दुकाने लावता येणार नाही. तसेच मनोरंजनपर कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत. -महेंद्र शेंडे सरपंच, करडी. निलज : गरदेव यात्रेत पुजेकरिता तयार करण्यात आलेला खांब.
    करडी गरदेव यात्रा सकाळ बातमी