कपिल शर्मा
कपिल शर्मा (२ एप्रिल १९८१) हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि फॅमिली टाईम विथ कपिल या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Indian actor and comedian | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | ਕਪਿਲ ਸ਼ਰਮਾ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल २, इ.स. १९८१ अमृतसर | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.[१]
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते. त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.[२]
कार्यक्रमसंपादन करा
- कॉमेडी नाईट्स विथ कपिल
- द कपिल शर्मा शो
- फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
- छोटे मियॉं
- झलक दिखला जा
चित्रपटसंपादन करा
- एबीसीडी २
- भावनाओं को समझो
- फिरंगी
- कीस कीस को प्यार करु
चित्रदालनसंपादन करा
- ^ "20 most admired people in India". The Economic Times. 2022-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee". www.deccanchronicle.com. 2022-07-28 रोजी पाहिले.