कदम हे ९६ कुळी मराठी आडनाव आहे.कदम घराणे हे कर्नाटकचे प्रमुख राजघराणे आहे. प्रामुख्याने हे आडनाव उस्मानाबाद, नांदेड, रत्‍नागिरी, सातारा या जिल्हात आढळते. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हात प्रमुख आडनाव म्हणून या आडनावाकडे बघितले जाते. तसेच कदम हे आडनाव मराठ्यांच्या सुर्यवंशम कुळातील आहे. सुर्यवंशम म्हणजे लढाई करणारे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

संपादन

अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत बाजी कदमराव नावाचे देवळाली प्रवरा येथील एक सेनाधिकारी होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवल्याबद्दल त्यांना साक्री आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा कर्नाटकातील बंकापूर येथे मृत्यू झाला. त्यानंतर कदम घराण्याचे वंशज शिवाजी राजांच्या सेवेत मराठा दौलतीत दाखल झाले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी कदम शिवाजीराजांचे विश्वासू सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजीराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईतही कदम घराण्यातील योद्धे लढले होते [ संदर्भ हवा ].

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन