ओगुस्तँ लुई कॉशी
ओगुस्तॅं लुई कॉशी (ऑगस्ट २१, १७८९:पॅरिस - मे २३, १८५७:स्कोक्स, फ्रांस) हा फ्रेंच गणितज्ञ होता.
ओगुस्तँ लुई कॉशी | |
पूर्ण नाव | ओगुस्तॅं लुई कॉशी |
जन्म | ऑगस्ट २१, १७८९ पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू | मे २३, १८५७ स्को (Sceaux), फ्रांस |
निवासस्थान | फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
धर्म | कॅथॉलिक |
कार्यक्षेत्र | कॅल्क्युलस कॉम्प्लेक्स ऍनालिसिस |
कार्यसंस्था | École Nationale des Ponts et Chaussées École polytechnique |
प्रशिक्षण | École Nationale des Ponts et Chaussées |
ख्याती | कॉशीचा इंटिग्रल सिद्धांत (Cauchy integral theorem) |
गणित हा विषय म्हणजे बुद्धीला व्यायाम! या व्यायामासाठी आवश्यक असणारा बुद्धीचा खुराक उपजत असणारे, गणिताच्या अनेक कूटप्रश्नांची उत्तरे शोधून काढणारे फ्रेंच गणितज्ज्ञ ऑग्युस्तीन कोशी यांचा जन्म पॅरिस येथे २१ ऑगस्ट १७७९ रोजी झाला. फ्रान्समधल्या गणितातील नावाजलेल्या, एकोल पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. परंतु तो काळ फ्रेंच राज्यक्रांतीचा होता आणि त्यांचे वडील क्रांतिकारकांचे विरोधक. परिणामी, या संस्थेतील शिक्षकांनी त्यांची हेळसांड केली तेव्हा तेथून ते बाहेर पडले आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतले. परंतु गणिताच्या प्रेमापोटी याच क्षेत्रात संशोधन करण्याचे त्यांनी ठरवले. बहुपृष्ठांक आणि समरूप अर्थक्रियेबद्दल त्यांनी मांडलेले दोन सिद्धान्त एकत्रित करून ‘निर्धारक’च्या अत्याधुनिक संकल्पनेला जन्म दिला. यानंतर त्यांनी द्रवीय पृष्ठावरील लहरीच्या प्रसरणाची गणिती प्रक्रिया मांडल्याने त्यांना ‘अॅकॅडमी डे’ सायन्सेसचे पारितोषिक देण्यात आले. परिणामी, त्यांची ‘अॅकॅडमी डे’ सायन्समध्ये निवड करण्यात आली. त्यांनी विशुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन्ही शाखांतील समस्यांवर मांडलेले सिद्धान्त स्वीकारण्यात आले. विश्लेषणाच्या तर्कशास्त्रीय पाया सुधारण्याच्या समस्येवरही त्यांनी संशोधन केले.
फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ गणितज्ज्ञ म्हणून एव्हाना त्यांचा नावलौकिक झाला होता. ज्या संस्थेतून हेळसांड झाल्याने ते बाहेर पडले, त्याच पॉलिटेक्निक संस्थेत अध्यापक म्हणून मोठय़ा सन्मानाने त्यांची नियुक्ती झाली. त्यांना ‘कॉलेज द फ्रान्स’ आणि सॉर्बान येथे व्याख्यानासाठी बोलावण्यात येऊ लागले. भूमितीशास्त्रातील काटेकोरपणा गणितात त्यांना आणावयाचा होता. २३ मे १८५७ रोजी त्यांचे निधन झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |