ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट
(ओक्लाहोमा सिटी बॉम्बहल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटी शहरात दहशतवाद्यांनी १९ एप्रिल, १९९५ रोजी घडवून आणलेला मोठा बॉम्बहल्ला होता. एक ट्रक भरून विस्फोटके वापरून केलेल्या या हल्ल्यात १६८ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या आणि इतर ६८० जखमी झाल्या. टिमोथी मॅकव्हे आणि टेरी निकोल्स या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात एफ.बी.आय.ची आल्फ्रेड पी. मराह बिल्डिंगचा तिसरा भाग नष्ट झाला आणि जवळपासच्या ३२४ इमारतींना धक्का बसला. या प्रचंड हल्ल्या २५८ इतर इमारतींवरील काचा फुटल्या आणि ८६ मोटारकार जळून गेल्या. या एका हल्ल्यात ६५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाल्य्चा अंदाज आहे.
स्थानिक दहशतवाद्यांनी अमेरिकेवर केलेला हा सर्वाधिक जीवघेणा हल्ला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |