ओंकारेश्वर
ओंकारेश्वर | ||
नाव: | ॐकारेश्वर मंदिर | |
---|---|---|
निर्माता: | स्वयंभू | |
निर्माण काल : | अति प्राचीन | |
देवता: | ॐ | |
वास्तुकला: | हिन्दू | |
स्थान: | मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यामध्ये | |
ॐकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्याच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास १२ मैल (२० कि.मी.) अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह ॐच्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत.
- ॐकारेश्वर
- अमरेश्वर
ॐकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ॐ सारखा आहे. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.
इतिहास
संपादनदेवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातीची १८ हजार शिवलिंगे तयार करून, पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे..
कथा
संपादनराजा मांधाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हा पासून ही तीर्थ नगरी ओंकार-मान्धाता या नावानेही ओळखली जाऊ लागली.
ओंकारेश्वरातील अन्य देवळे
संपादनओंकारेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये चोवीस अवतार, माता घाट (सेलानी), सीता वाटिका, धावड़ी कुंड, मार्कण्डेय शिला, मार्कण्डेय संन्यास आश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञान शाला, बड़े हनुमान, खेड़ापति हनुमान, ओंकार मठ, माता आनंदमयी आश्रम, ऋणमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आड़े हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चॉंद-सूरज दरवाजे, वीरखला, विष्णू मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसिंह टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चन्द्रमोलेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा वगैरे देवळे आहेत.
ओंकारेश्वराला कसे जातात?
संपादन- ओंकारेश्वर हे इंदूरपासुन ७७ किमी अंतरावर इंदूर- खांडवा महामार्गावर आहे.
- ॐकारेश्वर रोड हे रेल्वेस्थानक गावापासून १२ किमी अंतरावर आहे.
- नर्मदा नदीत होड्या सुरू असतात, त्यांतूनही ओंकारेश्वराला पोहोचता येते.
- खांडवा शहरापासून ॐकारेश्वर ७२ किमीवर आहे.
उज्जैन ते ओंकारेश्वर
संपादनतुम्ही उज्जैन हूून इंदोर मार्गे ओंकारेश्वरला बसने पोहचू शकता. उज्जैन किंवा इंदोर हुन रेल्वे उपलब्ध नाही.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- Jyotirlinga Virtual Darshan
- http://www.templenet.com/Madhya/Omkareshwar.htm
- http://www.narmada.org/
- Omkareshwar Jyotirling - Google Earth Community Archived 2007-09-30 at the Wayback Machine.
- http://emilie.cremin.free.fr/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |