आयर्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७
आयर्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. सदर दौऱ्यावर ते दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक असे एकूण दोन एकदिवसीय सामने खेळले.[१] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०६ धावांनी तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ गडी राखून अशा दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना खूप मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना हा सुधारित डीआरएस प्रणाली वापरली गेलेला पहिला सामना होता.[२]
संघ
संपादनआयर्लंड[३] | ऑस्ट्रेलिया[४] | दक्षिण आफ्रिका[५] |
---|---|---|
सुरुवातीला आयर्लंडविरुद्ध कर्णधार म्हणूण ए.बी. डी व्हिलियर्सची नेमणूक झाली होती. परंतु दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याच्या जागी फाफ डू प्लेसीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली त्याशिवाय रायली रॉसूचा संघात समावेश करण्यात आला.[६] गुडघ्याच्या दुखापतीमुळे ख्रिस मॉरिस दोन महिने खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी ड्वेन प्रीटोरियसला संघात स्थान मिळाले.[७]
दक्षिण आफ्रिका वि. आयर्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: टेंबा बवुमा, ॲंडीले फेहलुक्वायो, ड्वेन प्रीटोरियस (सर्व दक्षिण आफ्रिका)
- टेंबा बवुमा हा पदार्पणातील एकदिवसीय सामन्यात शतक करणारा बारावा खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड
संपादन
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "दक्षिण आफ्रिका पुढच्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा करणार" (इंग्रजी भाषेत). २१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका-आयर्लंड एकदिवसीय सामन्यामध्ये नवीन डीआरएस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंटरकॉंटिनेन्टल चषक आणि दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी डॉकरेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका संघात फेहलुक्वायोची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्याला ए.बी. डी व्हिलियर्स मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे मॉरिस दोन महिने संघाबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.