ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाचा इटली दौरा, २०२१

ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान इटलीचा दौरा केला. इटली महिलांनी या मालिकेद्वारे आपला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. सर्व सामने स्पिनासिटो मधील रोम क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. योजनेनुसार ऑस्ट्रिया, इटली आणि जर्सी या तीन संघांमध्ये तिरंगी मालिका खेळवली जाणार होती परंतु जर्सीच्या माघार घेण्याने ऑस्ट्रिया आणि इटली मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इटालियन क्रिकेट बोर्डाने संघाच्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यासाठी कुमुदु पेड्रीक हिला इटलीच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले. ऑस्ट्रियाचा हा पहिला द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी विदेश दौरा होता.

ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाचा इटली दौरा, २०२१
इटली महिला
ऑस्ट्रिया महिला
तारीख ९ – १२ ऑगस्ट २०२१
संघनायक कुमुदु पेड्रीक गंधाली बापट
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रिया महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा कुमुदु पेड्रीक (१२५) अँड्रिया-मे झेपेडा (१११)
सर्वाधिक बळी शेरॉन विथेनेज (७) व्हॅलेंटिना अव्डीलाज (८)

मे २०२० मध्ये जर्मनीविरुद्ध ५-० ने पराभव झाल्यावर अँड्रिया मे-झेपेडा हिने ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिल्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रियन क्रिकेट बोर्डाने गंधाली बापट हिला ऑस्ट्रियाच्या कर्णधारपदी नियुक्त केले. इटलीने पहिला सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा इटली महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय होता. ऑस्ट्रिया महिलांनी मालिका ३-२ ने जिंकली आणि पहिला वहिला मालिका विजय संपादन केला.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
९ ऑगस्ट २०२१
०९:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१०७/३ (२० षटके)
वि
  इटली
१०८/२ (१६.१ षटके)
अँड्रिया मे-झेपेडा ३३ (६०)
दिशानी समरविक्रमा १/१४ (४ षटके)
कुमुदु पेड्रीक ४७* (४७)
व्हॅलेंटिना अव्डीलाज २/९ (३.१ षटके)
इटली महिला ८ गडी राखून विजयी.
रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटो
पंच: क्लाउडिओ फॅब्री (इ) आणि शनाका फर्नांडो (इ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • इटली महिलांचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • इटलीमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • इटली आणि ऑस्ट्रिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ऑस्ट्रिया महिलांनी इटलीमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • इटली महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच ऑस्ट्रियाविरुद्ध देखील इटलीने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना जिंकला.
  • तेषाणी अरलिया, रशिनी अथिती, गायत्री बटागोडा, निरोशनी दिमिंगुवारिगे, सेवमिनी काननकेगे, सदाली मालवट्टा, दिलाशा नानायकरा, कुमुदु पेड्रीक, दयाना समरसुंघे, दिशानी समरविक्रमा, शेरॉन विथेनेज (इ), गंधाली बापट, महादेवा पाथिरन्नेहेलेज आणि अस्मान सैफी (ऑ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१० ऑगस्ट २०२१
०९:००
धावफलक
इटली  
९८/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
९९/३ (१९.१ षटके)
दिशानी समरविक्रमा ३३ (३८)
सिल्व्हिया कैलाथ १/११ (२ षटके)
गंधाली बापट १९ (३५)
दिशानी समरविक्रमा १/१२ (४ षटके)
ऑस्ट्रिया महिला ७ गडी राखून विजयी.
रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटो
पंच: क्लाउडिओ फॅब्री (इ) आणि शहिद मुहम्मद (बे)
  • नाणेफेक : इटली महिला, फलंदाजी.
  • कोमती रेड्डी (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • ऑस्ट्रियाने इटलीविरुद्ध पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना जिंकला.


३रा सामना

संपादन
११ ऑगस्ट २०२१
०९:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१२०/५ (२० षटके)
वि
  इटली
११३/३ (२० षटके)
अँड्रिया-मे झेपेडा ४३ (४४)
शेरॉन विथेनेज ३/३२ (४ षटके)
कुमुदु पेड्रीक ५०* (६६)
सिल्व्हिया कैलाथ १/१८ (२ षटके)
ऑस्ट्रिया महिला ७ धावांनी विजयी.
रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटो
पंच: शनाका फर्नांडो (इ) आणि शहिद मुहम्मद (बे)
  • नाणेफेक : इटली महिला, क्षेत्ररक्षण.
  • सारा सबली (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना

संपादन
११ ऑगस्ट २०२१
१६:००
धावफलक
इटली  
७३ (१७.१ षटके)
वि
  ऑस्ट्रिया
७४/४ (१२.१ षटके)
रशिनी अथिती ८* (१८)
व्हॅलेंटिना अव्डीलाज ४/१२ (४ षटके)
जो-अँटोनेट स्टीग्लिट्झ १४ (१४)
शेरॉन विथेनेज २/२२ (४ षटके)
ऑस्ट्रिया महिला ६ गडी राखून विजयी.
रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटो
पंच: अली हसन (इ) आणि शहिद मुहम्मद (बे)
  • नाणेफेक : इटली महिला, फलंदाजी.
  • फ्रान्सिस्का व्हॅकेरेला (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


५वा सामना

संपादन
१२ ऑगस्ट २०२१
१६:००
धावफलक
इटली  
९९/५ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
९८/८ (२० षटके)
कुमुदु पेड्रीक २८ (३७)
सिल्व्हिया कैलाथ १/४ (१ षटक)
गंधाली बापट ३७ (३६)
दिशानी समरविक्रमा २/९ (४ षटके)
इटली महिला १ धावेने विजयी.
रोम क्रिकेट मैदान, स्पिनासिटो
पंच: अली हसन (इ) आणि शनाका फर्नांडो (इ)
  • नाणेफेक : इटली महिला, फलंदाजी.
  • निपुनी पोन्ननपेरुमेज (इ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.