मिनू मसाणी

भारतीय राजकारणी
(एम.आर. मसाणी या पानावरून पुनर्निर्देशित)

मिनोचेम रूस्तम मसानी' उर्फ मिनू मसानी (મીનુ મસાણી) (२० नोव्हेंबर, इ.स. १९०५ - २७ मे, इ.स. १९९८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते.

शिक्षण

संपादन

मीनु मसाणी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि लिकन्स इन या संस्थांत झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईच्या न्यायालयात वकिली सुरू केली.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

संपादन

काही दिवसांनंतर मीनु मसाणी यांनी वकिली करणे सोडून दिले आणि त्यांनी महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मीनु मसाणी यांना भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकदा १९३२मध्ये आणि एकदा १९३३ मध्ये तुरुंगात टाकले होते.

पक्षस्थापना

संपादन

तुरुंगातून बाहेर पडल्यावर मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि युसुफ मेहेर‍अली यांनी मिळून काँग्रेस सोशालिस्ट पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याच सुमारास, म्हणजे इ.स. १९४३ मध्ये मिनू मसानी हे वयाच्या ३८व्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचे मेयर म्हणून निवडून आले. इतक्या तरुण वयात महापौर होण्याचा हा विक्रम १९९० साली मोडला गेला. ते १९६३ मध्ये पोटनिवडणुकीत गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही ते राजकोटमधूनच लोकसभेवर निवडून गेले.