एट्रियल सेप्टल डिफेक्ट

अलिंद पटल दोष हा एट्रियल सेप्टल डिफेक्ट (ए.एस.डी.) या नावाने ओळखला जातो. हा मानवी हृदयात जन्मतः आढळणारा दोष आहे. हा दोष असलेल्या हृदयातील डाव्या एट्रियम[मराठी शब्द सुचवा] म्हणजे डाव्या अलिंदामधून रक्त उजव्या अलिंदामध्ये वाहते. या दोन कप्प्यांमधील पडदा (सेप्टम) यामध्ये एक किंवा अधिक छिद्रे असल्याने असे शक्य होते. यामुळे डाव्या एट्रियममधील (शुद्ध) रक्त उजव्या एट्रियममधून पुन्हा फुफ्फुसाकडे जाते व गरज नसताना पुन्हा शुद्ध होते. यामुळे हृदयावर ताण येतो. हा दोष दुरुस्त न केल्यास हृदयाचा आकार बेढब होतो व इतर हृदयविकार होण्याची शक्यता दाट होते.

हे सुद्धा पहा

संपादन