एचएमएस अजॅक्स (२२)
एच.एम.एस. अजॅक्स ही रॉयल नेव्हीची लियॅंडर वर्गाची हलकी क्रुझर होती. हीने दुसऱ्या महायुद्धातील रिव्हर प्लेटच्या लढाईत तसेच क्रीटची लढाई व माल्टाची लढाई यांत भाग घेतला होता. याशिवाय ही क्रुझर टोब्रुकच्या वेढ्यात रसदपुरवठ्याची रक्षकनौका म्हणून तैनात होती.
हा लेख दुसऱ्या महायुद्धातील क्रुझर अजॅक्स याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एच.एम.एस. अजॅक्स.
अजॅक्स नाव असलेली ही रॉयल नेव्हीची आठवी नौका होती. हीची बांधणी फेब्रुवारी ७, १९३३ रोजी सुरू झाली व एप्रिल १२, १९३५ रोजी ही लढाऊ सेवेसाठी रुजू झाली.