एकता भयान (१९९५ - ) एक पॅराअ‍ॅथलीट आहे.  महिलांच्या क्लब थ्रो आणि डिस्कस थ्रो (थाळी फेक) खेळांमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या लंडन 2017 आणि दुबई 2019 अशा सलग दोन आवृत्तींमध्ये भाग घेतल्यानंतर तिने पॅरालिम्पिकच्या कोटातून टोकियो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. 2016 मध्ये बर्लिन, 2017 मध्ये दुबई आणि 2018 मध्ये ट्युनिशिया येथे झालेल्या आयपीसी ग्राँ प्री स्पर्धांमध्ये भाग घेत तिने अनेक पदकांची कमाई केली आहे.

सन 2016, 2017 आणि 2018च्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकविणारी एकता ही विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2018 मध्ये तिला राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय, 2019 मध्ये महिला दिनानिमित्य हरियाणाच्या माननीय राज्यपालांच्या हस्ते तिला राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

गोस्पोर्ट्स फाऊंडेशनच्या पॅरा चॅपियन कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला सहाय्य पुरवले जाते. [4]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

भयान यांचा जन्म 1985 साली हरियाणा येथील हिसार येथे झाला. तिचे वडील बलजीत भयान हे सेवानिवृत्त जिल्हा फलोत्पादन अधिकारी आहेत, आणि तिला दोन भाऊ आहेत. [3]

2003 मध्ये झालेल्या एका रस्ते अपघातामध्ये एकताच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. तिने बरे होण्यासाठी रुग्णालयात नऊ महिने राहावे लागले. दोन ऑपरेशन झाली, आणि पुनर्वसनावर बरीच मेहनत घेतल्यानंतर तिने तिचा आत्मविश्वास पुन्हा कमावला.

हिसार येथून तिने आपली पदवी पूर्ण केली. 2011 मध्ये ती हरियाणा नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक रोजगार अधिकारी म्हणून रुजू झाली. [3]

2015 मध्ये तिची भेट अ‍ॅथलीट अमित सरोहा यांच्याशी झाली आणि त्यांनीच तिला आपल्यासारखी पॅरा अँथलीट होण्याची प्रेरणा दिली. तिने डिस्कस थ्रो खेळासाठी प्रशिक्षण सुरू केले. [4]

व्यावसायिक उपलब्धी संपादन

एकताच्या स्पर्धात्मक कारकिर्दीची सुरुवात जुलै 2016मध्ये बर्लिन येथे झालेल्या आयपीसी ग्राँ प्रीपासून झाली. तिथे तिला क्लब थ्रो स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळाले. त्यानंतर तिने पंचकुला येथे झालेल्या 2016च्या राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिने क्लब थ्रो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक व डिस्कस थ्रो स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले.

2017मध्ये तिने दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. दुबई येथे 2017साली झालेल्या आयपीसी ग्राँ प्रीमध्येही तिने भाग घेतला. त्या स्पर्धेत तिने चौथे स्थान पटकावले आणि दोन्ही स्पर्धांमध्ये नवीन आशियाई विक्रम नोंदविला. त्यावर्षी एकताने लंडन येथे आयोजित तिच्या पहिल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला. तिथे तिने क्लब थ्रो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर 6वे मानांकन आणि आशियात प्रथम स्थान पटकावले. [4]

आधीच राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या एकताने २०१८ मध्ये पंचकुला येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्यांदा भाग घेतला आणि दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यावर्षी तिचे लक्ष्य इंडोनेशियाच्या जकार्ता येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 2018 आशियाई पॅरा गेम्सकडे होते, ज्याची तयारी ती वर्षभर करत होती. तिने ट्युनिशिया येथे आयोजित आयपीसी ग्राँ प्रीमध्ये याच यशाची पुनरावृत्ती केली, जेव्हा तिने क्लब थ्रोमध्ये गोल्ड आणि डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले.

ऑक्टोबर 2018 मध्ये क्वालालंपूरमध्ये महिला क्लब थ्रो स्पर्धेत प्रथम स्थान मिळवत एकताने आशियाई पॅरा स्पर्धेमध्ये भारतासाठी चौथे सुवर्ण जिंकले. तिने चौथ्या प्रयत्नात 16.02 मीटरचा तिचा सर्वोत्कृष्ट थ्रो नोंदवला, युएईच्या अल्काबी थेकराच्या 15.75 मीटरच्या थ्रोला मागे टाकले आणि ती F32/51 स्पर्धा जिंकली. आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकता ही दुसरी भारतीय महिला ठरली आणि तिच्या मायभूमी हरियाणामधील पहिलीच महिला.

2019 मध्ये वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये एकता दुसऱ्यांदा सहभागी झाली, आणि त्यानंतर दुबई येथील 2019च्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये खेळताना तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये खेळण्यासाठी स्थान पक्के केले.

एकता ही हरियाणा सरकारमध्ये रोजगार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. [1]  2020 मध्ये स्पोर्ट्स्टार एसेस अवॉर्ड्समध्ये तिला पॅरा-स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. [6] यापूर्वी, ती ईएसपीएनची 2018 वर्षातली सर्वोत्कृष्ट दिव्यांग अ‍ॅथललीट जाहीर झाली होती. [5]

वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव: एकता बलजीत भयान

देश: भारत

जन्म: 7 जून 1985 (वय 35)

हिसार, हरियाणा, भारत

क्रीडा

प्रतिनिधित्व: भारत

खेळ: ट्रॅक आणि फील्ड एफ-51

अपंगत्व: क्वाड्रायप्लेजिक पाठीच्यास कण्याला दुखापत

अपंगत्व क्लास एफ-51

स्पर्धा: क्लब आणि डिस्कस थ्रो

पदक रेकॉर्ड

आशियाई पॅरा स्पर्धा

सुवर्णपदक - प्रथम  स्थान 2018 जकार्ता, इंडोनेशिया क्लब थ्रो

आयपीसी ग्राँ प्री

सुवर्णपदक - प्रथम स्थान 2018 ट्युनिशिया क्लब  थ्रो

कांस्यपदक - तिसरे स्थान 2018 ट्युनिशिया डिस्कस  थ्रो

रौप्य पदक - दुसरे स्थान 2016 बर्लिन क्लब थ्रो

नॅशनल पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

सुवर्ण पदक - प्रथम स्थान 2018 पंचकुला क्लब थ्रो

सुवर्ण पदक - प्रथम  स्थान 2018 पंचकुला डिस्कस  थ्रो

सुवर्ण पदक - प्रथम  स्थान 2017 जयपूर क्लब थ्रो

सुवर्ण पदक - प्रथम  स्थान 2017 जयपुर डिस्कस थ्रो

सुवर्ण पदक - प्रथम  स्थान 2016 पंचकुला क्लब  थ्रो

कांस्यपदक - तिसरे  स्थान 2016 पंचकुला डिस्कस  थ्रो

संदर्भ संपादन

https://www.thehindu.com/sport/gold-winning-para-athlete-ekta-bhyan-on-life-and-sports/article24431726.ece (1)

https://www.indiatimes.com/sports/from-being-paralysed-waist-down-to-winning-medals-at-world-para-athletics-gp-ekta-bhyan-is-full-of-heart-determination-349354.html [2]

https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/Before-Deepa-Ekta-Bhyan-had-made-state-proud/articleshow/54339502.cms [3]

https://oldweb.indusind.com/content/forsports/programmes/para-champions/ekta-bhyan.html [4]

https://www.espn.in/espn/story/_/id/26386123/espn-india-awards-2018-differently-abled-athlete-year-ekta-bhyan [5]

https://sportstar.thehindu.com/aces-awards/ekta-bhyan-wins-sportstar-aces-2020-para-sportswoman-of-the-year-para-club-throw/article30556060.ece [6]