अस्तेक दिनदर्शिका
ऍझ्टेक दिनदर्शिका ही ऍझ्टेक आणि मध्य मेक्सिकोमधील प्री-कोलंबियन संस्कृतीतील जमाती दिनदर्शिका म्हणून वापरीत. प्राचीन मेसोअमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी ही एक आहे.
ह्या दिनदर्शिकेत ज्याला क्स्युपोवाली ("वर्ष मोजणी") म्हणत असे ३६५ दिवसांचे दिनदर्शिका चक्र आणि ज्यास टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") म्हणत असे २६० दिवसांचे धार्मिक चक्र अशी दोन चक्रे असत. ही दोन्ही चक्रे एकाच वेळी सुरू असतात. ३६५ दिवसांच्या ५२ वर्षांनंतर येणाऱ्या दिवसाला शतकाचा किंवा दिनदर्शिका चक्राचा पहिला दिवस म्हणत.
टोनाल्पोवाली
संपादन२६० दिवसांच्या चक्रासाठी टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") ही संज्ञा आहे. प्रत्येक दिवसाची तारीख एक ते तेरा यांपैकी एक आकडा आणि दिवसांच्या २० चिन्हांपैकी एक असे दोन घटक मिळून दर्शवितात. दर दिवशी आकडा एकने वाढतो आणि पुढचे चिन्ह येते. 'एक मगर', त्यानंतर 'दोन वारा', 'तीन घर', 'चार सरडा', असे होत होत शेवटी 'तेरा वेत' ही तारीख येते. तेराव्या वेत या चिन्हानंतरचे चौदावे चिन्ह बिबट्या. म्हणून पुढची तारीख 'एक बिबट्या'. पुढची 'दोन गरुड' आणि शेवटची विसावी 'सात पुष्प'. चिन्हे संपली. त्यामुळे त्यानंतर पुढचा आकडा आणि पहिल्या चिन्हापासून म्हणजे 'आठ मगर" पासून पुढे चक्र सुरू राहते आणि पुढेपुढे जात रहाते. २० चिन्हे आणि १३ आकडे ह्यांच्या चक्राचे पूर्ण २६० दिवस (१३×२०) झाले की पुन्हा 'एक मगर' पासून सुरुवात होते.
दिवस चिन्हे
संपादनइतर मेसोअमेरिकन दिनदर्शिका, मुख्यत्वे मिक्सटेक्सांकडून वापरली जाणारी चिन्हे आणि ऍझ्टेक दिवस चिन्हांत दाखवलेले प्राणी किंवा वस्तू यांत बरेच साम्य आहे.
दिवस चिन्हांची चित्रे काही अझ्टेक ग्रंथात दिली आहेत, तर काही मोठ्या दगडांवर कोरलेली आहेत. कोडेक्स मॅग्लियाबेचियानो वरून घेतलेली काही चिन्हे अशी:
|
|
एहेकाट्ल आणि ट्लालोक ह्या देव अनुक्रमे वारा आणि पाऊस ह्यांच्याची संबंधित असल्याने वारा आणि पाऊस ह्यांना त्यांची चिन्हे दिली आहेत.
त्रेचेना
संपादन१३ अंकांच्या दिवसांच्या संचास त्रेचेना ही स्पॅनिश संज्ञा वापरली जाते (त्रेचे = "तेरा"). २६०-दिवस चक्रातील प्रत्येक २० त्रेचेना कुठल्यातरी देवदेवतांशी संबंधित असे.
|
|