उषा बारले (मे २, इ.स. १९६८:छत्तीसगढ, भारत - ) या छत्तीसगढ मधील पंडवानी गायिका आहेत. भारत सरकारने पंडवानी क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१]

उषा बारले
आयुष्य
जन्म २ मे १९६८
जन्म स्थान भिलाई , छत्तीसगढ , भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

जीवन आणि कारकिर्द

संपादन

कापालिक शैलीतील पंडवानी गायिका उषा बारले यांचा जन्म २ मे १९६८ रोजी भिलाई येथे झाला.[२] त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पंडवानी गायनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि नंतर तिजनबाईंकडून कलेतील बारकावे शिकून घेतले.[३] उषा बरले यांनी केवळ छत्तीसगडमध्येच नाही तर न्यू यॉर्क, लंडन आणि जपान देशासह १२ हून अधिक देशांमध्ये पंडवानी सादर केली आहे.[४]गुरू घासीदास यांचे चरित्र पहिल्यांदा पंडवानी शैलीत सादर करण्याचे श्रेय त्यांना जाते. छत्तीसगड राज्याच्या आंदोलनात उषा बरले यांचाही सहभाग होता आणि १९९९ मध्ये वेगळ्या राज्यासाठी दिल्लीत झालेल्या निदर्शनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. २०१४ मध्ये त्यांना छत्तीसगड राज्य सरकारने गुरू घासीदास सन्मानानेही सन्मानित केले आहे.[५]

पुरस्कार

संपादन
  • छत्तीसगड राज्य सरकारचा गुरू घासीदास सन्मान - २०१४ [५]
  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार - २०२३ [१]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Padma Awards 2023 announced". pib.gov.in (English भाषेत). 25 January 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "पिता ने कुएं में फेंका, फिर भी गाती रहीं पंडवानी:पद्मश्री मिला तो पुराने दिनों को याद कर छलक गए उषा के आंसू". Bhaskar.com (Hindi भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "गुरु के बाद शिष्या भी पद्मश्री: गायकी के चलते ऊषा को पिता ने फेंक दिया था कुएं में; तीजनबाई ने सिखाई पंडवानी". amarujala.com (Hindi भाषेत). 26 January 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Padma Shri: फल बेचकर गृहस्थी चलाई, अब पद्मश्री पुरस्कार से किया गया सम्मानित". patrika.com (Hindi भाषेत). 28 January 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b "Guru Ghasidas Samman". cgculture.in (English भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)