उमा तुली (३ मार्च, १९४३:नवी दिल्ली, भारत - ) या भारतीय समाजसेविका आहेत. या अमर ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट या सामजसेवी संस्थेच्या संस्थापिका आणि शिक्षिका आहेत. या संस्थेद्वारे तुली शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना मदत करतात.

तुली यांनी ग्वाल्हेरमधील जीवाजी विद्यापीठातून अनुस्नातक पदवी घेतली व मॅंचेस्टर विद्यापीठातून अजून एक पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्लिश साहित्यात विद्यावाचस्पतीची पदवी घेतली. त्यांनी ग्वाल्हेर व दिल्ली येथे ३० वर्षे शिक्षिका म्हणून काम केले.