उमरेड विधानसभा मतदारसंघ
उमरेड विधानसभा मतदारसंघ - ५१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार उमरेड मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील १. भिवापूर २. उमरेड आणि ३.कुही या तालुक्यांचा समावेश होतो. उमरेड हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजू देवनाथ पारवे हे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. लोकसभा 2024 निवडणूकीच्या पूर्वी मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा राजिनामा देऊन रामटेक लोकसभेची निवडणूक त्यांनी लढविली पण त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
माहीतीच्या आधारे भिवापूर तालुक्यातील 121 गावे उमरेड तालुक्यातील 170 गावे व कुही तालुक्यातील 165 गावे मिळून 456 गावे उमरेड विधानसभेत समाविष्ट आहेत. .[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनउमरेड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- भिवापूर तालुका
- उमरेड तालुका
- कुही तालुका
उमरेड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
उमरेड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुधीर लक्ष्मणराव पारवे | भाजप | ८५,४१६ |
शिरीष महादेवराव मेश्राम | काँग्रेस | ४०,७२० |
संदिप गवई | अपक्ष | १५,९४३ |
विनोद भास्करराव पाटील | बसपा | १२२४६ |
रुक्षदास मोकासराव बनसोड | अपक्ष | ५,२८१ |
धरमदास मिरुगजी चौधरी | अपक्ष | ३१३१ |
गोडघाटे तारकेश्वर देविदास | डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी | १५९१ |
रामटेके चंद्रभान बळीराम | अपक्ष | ११२६ |
देशपांडे संजय सवाजी | Hindustan Janta Party | ३३४ |
PRASHANT BHIMRAO MESHRAM | झारखंड मुक्ती मोर्चा | २६५ |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
संपादनविजयी
- सुधीर पारवे - भारतीय जनता पक्ष
- राजु पारवे - काँग्रेस
- संजय मेश्राम - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
नोंदी
संपादन- ^ द्विसदस्यीय जागा.