इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड


इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड हा १९८९मध्ये प्रदर्शित अमेरिकन थरारपट आहे. याची कथा जॉर्ज लुकास आणि जॉर्ज लुकास आणि मेनो मेजेसची असून दिग्दर्शन स्टीव्हन स्पीलबर्गने केले आहे. इंडियाना जोन्स चित्रपट मालिकेतील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात हॅरिसन फोर्ड, शॉन कॉनरी अॅलिसन डूडी, डेनहोम इलियट, ज्युलियन ग्लोव्हर, रिव्हर फिनिक्स आणि जॉन ऱ्हिस-डेव्हिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड
दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग
निर्मिती लुकासफिल्म
कथा जॉर्ज लुकास
प्रमुख कलाकार हॅरिसन फोर्ड, शॉन कॉनरी, डेनहोम इलियट, अॅलिसन डूडी, जॉन ऱ्हिस-डेव्हिस
संकलन मायकेल काह्न
छाया डग्लस स्लोकोम्ब
संगीत जॉन विल्यम्स
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८९
वितरक पॅरामाउंट पिक्चर्स
अवधी १२८ मिनिटे
निर्मिती खर्च ४ कोटी, ८० लाख अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ४७ कोटी, ४२ लाख अमेरिकन डॉलर
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


या चित्रपटाचे कथानक १९३८मधील आहे. यात इंडियाना जोन्सचे वडील होली ग्रेलचा शोध घेत असताना त्यांचे अपहरण होते. इंडियाना आपल्या वडीलांना सोडविण्यास जातो.

संदर्भ

संपादन