इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. हा दौरा एक वर्षाने पुढे ढकलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या कालावधीत झाला. फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये न्यू झीलंडमध्येच महिला क्रिकेट विश्वचषक नियोजित वेळापत्रकानुसार होणार होता, परंतु कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी विश्वचषक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली. त्यामुळे न्यू झीलंड महिला संघाला सराव व्हावा या अनुशंगाने इंग्लंड महिला संघ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी न्यू झीलंडला आला. महिला ट्वेंटी२० सामने हे न्यू झीलंड पुरुष संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. न्यू झीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाइन हिने केले तर अनुभवी हेदर नाइट हिला इंग्लंडची कर्णधार म्हणून कायम केले गेले.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१ | |||||
न्यू झीलंड महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १४ फेब्रुवारी – ७ मार्च २०२१ | ||||
संघनायक | सोफी डिव्हाइन | हेदर नाइट (म.ए.दि., १ली,२री म.ट्वेंटी२०) नॅटली सायव्हर (३री म.ट्वेंटी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एमी सॅटरथ्वाइट (१३५) | टॅमी बोमाँट (२३१) | |||
सर्वाधिक बळी | आमेलिया केर (४) | नॅटली सायव्हर (५) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एमी सॅटरथ्वाइट (७६) | टॅमी बोमाँट (१०२) | |||
सर्वाधिक बळी | ली कॅस्पेरेक (४) | फ्रेया डेव्हीस (५) सोफी एसलस्टोन (५) साराह ग्लेन (५) नॅटली सायव्हर (५) | |||
मालिकावीर | टॅमी बोमाँट (इंग्लंड) |
महिला वनडे मालिकेआधी इंग्लंड महिला संघाने दोन ५० षटकांचे सराव सामने खेळले. ज्यातला एक सामना इंग्लंड महिलांनी जिंकला तर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंड संघ पराभूत झाला. एकदिवसीय मालिकेत पहिला सामना इंग्लंडने जिंकत मालिकेला साजेशी सुरुवात केली. इंग्लंडच्या सोफी एसलस्टोनने मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिच्या कारकिर्दीतले १०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यातही इंग्लंड महिलांनी उत्तम खेळत विजय संपादन करत एकदिवसीय मालिका जिंकली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यू झीलंडच्या एमी सॅटरथ्वाइटच्या ११९ धावांच्या शतकी खेळीमुळे न्यू झीलंडने इंग्लंड महिलांचा पराभव केला.
ऑकलंड मध्ये २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे टाळेबंदी जाहीर केल्याने महिला ट्वेंटी२० चे सर्व सामने वेलिंग्टनला हलविण्यात आले. महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका इंग्लंड महिलांनी ३-० अशी जिंकली.
ही मालिका संपताच मार्चमध्येच तीन महिला वनडे आणि तीन महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यास ऑस्ट्रेलियन महिला संघाने न्यू झीलंडचा दौरा केला.
सराव सामने
संपादन५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला
संपादनइंग्लंड महिला
२९९/९ (५० षटके) |
वि
|
न्यू झीलंड XI महिला
२७९/६ (५० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
५० षटकांचा सामना: इंग्लंड महिला वि न्यू झीलंड XI महिला
संपादनन्यू झीलंड XI महिला
३१६/५ (५० षटके) |
वि
|
इंग्लंड महिला
२८६ (४९.३ षटके) |
डॅनियेल वायट ५४ (४२) क्लॉडिया ग्रीन ५/५६ (१० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड XI महिला, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
इंग्लंड
१८१/२ (३३.४ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- ब्रुक हालीडे आणि फ्रॅन जोनस (न्यू) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
इंग्लंड
९९/३ (१६ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्रुक हालीडे (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादन