आर्गो हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. एका सत्यकथेवर आधारित असलेल्या आर्गोमध्ये १९७९ सालच्या इराणी क्रांतीदरम्यान तेहरानमध्ये अडकलेल्या अमेरिकन दूतावास कर्मचाऱ्यांची सी.आय.ए.कॅनडाद्वारे करण्यात आलेल्या सुटकेची कथा रंगवली आहे.

आर्गो
दिग्दर्शन बेन ॲफ्लेक
निर्मिती बेन ॲफ्लेक
जॉर्ज क्लूनी
पटकथा ख्रिस टेरियो
प्रमुख कलाकार बेन ॲफ्लेक
ब्रायन क्रॅन्स्टन
ॲलन अर्किन
जॉन गुडमन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १२ ऑक्टोबर २०१२
वितरक वॉर्नर ब्रदर्स
अवधी १२० मिनिटे
निर्मिती खर्च $४४.५ दशलक्ष
एकूण उत्पन्न $२३२.३ दशलक्ष

आर्गोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तसेच तो टीकाकारांच्या देखील पसंतीस उतरला. विशेषतः बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ८५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आर्गोला सर्वोत्तम चित्रपटासह इतर तीन पुरस्कार मिळाले.

बाह्य दुवे संपादन