आय.बी.एम.

(आयबीएम या पानावरून पुनर्निर्देशित)

आय.बी.एम. इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन’ ही शंभर वर्ष जुनी आहे. ही जगातील सगळ्यात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. १६ जून इ.स. १९११ रोजी विविध प्रकारच्या कार्यालयीन नोंदी ठेवण्याच्या कामापासून ते पंच कार्ड करण्याच्या व्यवसायात कंपनीने सुरुवात केली.

इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स
ब्रीदवाक्य On Demand Business, in demand people
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र संगणक हार्डवेर
संगणक सॉफ्टवेर
सल्लासेवा
माहिती तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापन
स्थापना इ.स. १८८९, कंपनी कायद्यानुसार इ.स. १९११
मुख्यालय अरमॉंक, न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती सॅम्युएल जे. पाल्मिसानो, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्पादने पूर्ण यादी
कर्मचारी ३५५,७६६ (इ.स. २००६)[]
पोटकंपनी ऍडस्टार
फाइलनेट
इन्फॉर्मिक्स
आयरिस असोसिएट्स
लोटस सॉफ्टवेर
रॅशनल सॉफ्टवेर
सिक्वेंट कॉंप्युटर सिस्ट्म्स
टिवोली सिस्टम्स, इन्कॉर्पोरेट
अपोलो कॉंप्युटर्स
संकेतस्थळ http://www.ibm.com/

१९५६ साली कंपनीने मॅग्नेटिक हार्ड ड्राईव्हचा शोध लावला. इ.स. १९७१ साली फ्लॉपी डिस्क आणि इ.स. १९६० साली पहिल्यांदा बार कोडचे तंत्रज्ञान आणले. क्रेडिट कार्डासाठी चुंबकीय पट्टीचे तंत्रज्ञान आय.बी.एम.ने पहिल्यांदा जगात आणले. इ.स. १९८१ साली व्यक्तिगत वापराचा संगणक प्रथम बाजारात आणला. भारतात या कंपनीने १९५१ साली प्रवेश केला.

संदर्भ

संपादन