आमीरखां
उस्ताद आमिर खान (मराठी लेखनभेद: आमीरखॉं ;) (१५ ऑगस्ट, इ.स. १९१२ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे भारतीय शास्त्रीय संगीतातील विख्यात गायक कलावंत होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतविश्वात त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे आहे. त्यांनी इंदूर घराण्याची स्थापना केली.
आमीरखां | |
---|---|
उपाख्य | सूररंग |
आयुष्य | |
जन्म | ऑगस्ट १५, इ.स. १९१२ |
जन्म स्थान | भारत |
मृत्यू | फेब्रुवारी १३, इ.स. १९७४ |
मृत्यू स्थान | इंदूर, मध्य प्रदेश, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | मुस्लिम |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
वडील | शाहमिर खान (गायक, वीणावादक) |
संगीत साधना | |
गुरू | शाहमिर खान |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | इंदूर घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
गौरव | पद्मभूषण पुरस्कार संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार |
पूर्वायुष्य व संगीत शिक्षण
संपादनआमीरखां यांचा जन्म भारतातील इंदूर या ठिकाणी संगीत कलावंत घराण्यात झाला. त्यांचे वडील शाहमीर खान हे भेंडीबझार घराण्याचे प्रसिद्ध सारंगीवादक व वीणावादक होते. ते इंदुरातील होळकरांच्या दरबारात आपली सेवा रुजू करत. त्यांचे आजोबा चंगे खान हे बहादूर शाह जफर यांच्या दरबारात गायक होते. आमीरखां यांची आई ते फक्त नऊ वर्षांचे असतानाच कालवश झाली. त्यांचे धाकटे बंधू बशीर हे ऑल इंडिया रेडियोच्या इंदूर स्टेशन येथे सारंगीवादक म्हणून रुजू होते.
आमीरखांना त्यांच्या वडिलांनी सारंगीचे धडे दिले. परंतु त्यांची गायकीतील रुची पाहून वडिलांनी त्यांना गायकीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यात त्यांनी मेरूखंड पद्धतीच्या गायकीवर जास्त भर दिला. अगदी कोवळ्या वयापासून आमीरखां यांचा वेगवेगळ्या पद्धतींच्या गायकींशी निकट परिचय होता, कारण इंदूरला भेट देणारे प्रत्येक संगीत कलावंत त्यांच्या घरी आल्यावाचून राहत नसत. घरी नित्यनियमाने संगीत मैफिली होत असत. आपल्या एका मामांकडून त्यांनी तबल्याचे धडेही घेतले.
संगीत प्रवास
संपादनइ.स. १९३४ मध्ये आमीरखां मुंबईला आले. तिथे त्यांनी काही संगीत कार्यक्रम केले आणि जवळपास सहा ध्वनिमुद्रिकांचे ध्वनिमुद्रण केले. वडिलांच्या सल्ल्यानुसार इ.स. १९३६ मध्ये ते मध्य प्रदेशाच्या रायगढ संस्थानच्या महाराज चक्रधर सिंघ यांच्या सेवेत रुजू झाले. अमीर खानांचे वडील इ.स. १९३७ मध्ये निवर्तले. त्यानंतर काही काळ खानसाहेब दिल्लीत तर काही काळ कोलकाता येथे राहिले. पण भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईत राहणे पसंत केले.
'सूररंग' या उपनावाने त्यांनी अनेक बंदिशींची रचना केली. त्यांची स्वतःची विशेष अशी गायकीची शैली होती. त्यांनी तराणा व पर्शियन मधील ख्यालयुक्त रचना पुढे आणल्या. ते अनेकदा झुमरा किंवा एकतालाचा वापर करत, तर बऱ्याचदा साथीला असलेल्या तबल्याचा साधा ठेका पसंत करत. त्यांचे सारंगीवादनाचे ज्ञान त्यांना गायकीच्या क्षेत्रात नाव कमावायला खूप उपयोगी पडले. जरी ते सारंगी वादनात कसलेले होते तरी त्यांनी साथीला बहुतेक वेळा तबला व तंबोराच वापरला. कधी कधी त्यांच्या साथीला मंद सुरांतील हार्मोनियमही असे. परंतु साथीला सारंगी त्यांनी क्वचितच वापरली.
चित्रपट क्षेत्रात पार्श्वगायन
संपादनजलशांमध्ये गाण्याखेरीज आमिर खान साहेबांनी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. बैजू बावरा, क्षुधितो पाषाण, शबाब, झनक झनक पायल बाजे हे त्यांतील महत्त्वाचे चित्रपट होत. गालीबवरील एका माहितीपटासाठी खानसाहेबांनी 'रहिये अब ऐसी जगह' ही गझलही गायली.
शिष्य
संपादनत्यांच्या शिष्यमंडळींमध्ये पंडित अमरनाथ, ए. कानन, श्रीकांत बकरे, सिंग बंधू, मुकुंद गोस्वामी, गजेन्द्र बक्षी, कंकणा बॅनर्जी, प्रद्युम्न कुमुद मुखर्जी व पूरबी मुखर्जी, हृदयनाथ मंगेशकर, अख्तर सादमनी, अमरजीत कौर, अजित सिंघ पेंटल, भीमसेन शर्मा, मुनिर खान व कमल बोस यांचा समावेश आहे.
पुरस्कार व गौरव
संपादनत्यांना इ.स. १९६७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविले गेले. इ.स. १९७१ मध्ये भारत सरकार ने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने भूषित केले.
संगीत तबकड्यांची यादी
संपादनविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
चित्रपट
चित्रपट : बैजू बावरा (संगीत दिग्दर्शक : नौशाद)
गीते :
'तोरी जय जय कर्तार' (राग पूरिया धनाश्री)
'सरगम' (राग दरबारी)
'लंगर कंकरिया जीना मारो' (राग तोडी, डी. व्ही. पलुसकरांसोबत)
'आज गावत मन मेरो झूमके' (राग देसी, डी. व्ही. पलुसकरांसोबत)
'घनन घनन घन गरजो रे' (राग मेघ)
चित्रपट : क्षुधितो पाषाण (संगीत दिग्दर्शक : अली अकबर खान)
गीते :
'कैसे कटे रजनी' (राग बागेश्री, प्रतिमा बॅनर्जी यांसोबत)
'पिया के आवन की' (खमाज रागातील ठुमरी)
मेघ रागातील तराणा
चित्रपट : शबाब (संगीत दिग्दर्शक : नौशाद)
'दया कर हे गिरिधर गोपाल' (राग मुलतानी)
चित्रपट : झनक झनक पायल बाजे (संगीत दिग्दर्शक : वसंत देसाई)
शीर्षक गीत 'झनक झनक पायल बाजे' (राग अडाणा)
चित्रपट : गूॅंज ऊठी शहनाई (बिस्मिल्ला खान यांचेसोबत रागमाला)
चंद्रकंस
देसी
बागेश्री
भटियार
मुलतानी
यमन
रागिणी (?)
रामकली
राग ललित : 'जोगिया मेरे घर आये'
शुद्ध सारंग
सार्वजनिक व खासगी ध्वनिमुद्रिका
अडाणा
अभोगी
अमीरखानी
अहीर भैरव
कोमल ऋषभ आसावरी
कलावती
काफी कानडा
कौशी कानडा
केदार
गुजरी तोडी
गौड मल्हार
चंद्रकंस
चंद्रमधू
चांदनी केदार
चारुकेशी
जनसंमोहिनी
जयजयवंती
जोग
तोडी
दरबारी
देशकार
नट भैरव
नंद
पूर्वी
पूरिया
पूरिया कल्याण
बरवा
बसंत बहार
बसंत मुखरी
बहार
बागेश्री
बागेश्री कानडा
बिलासखानी तोडी
बिहाग
बैरागी
भटियार
भीमपलासी
मधुकंस
मारवा
मारू कल्याण
मालकंस
मियां मल्हार
मुलतानी
मेघ
यमन
यमन कल्याण
रामकली
राम कल्याण
रागेश्री
रामदासी मल्हार
ललित
शहाना
शुद्ध कल्याण
शुद्ध सारंग
श्री
हरिकंस
हंसध्वनी
हिंडोल कल्याण
हिंडोल बसंत
हेमकल्याण
बाह्य दुवे
संपादन- उस्ताद अमीर खान यांच्या संगीत तबकड्यांची यादी Archived 2012-04-06 at the Wayback Machine.
- पं. निखिल बॅनर्जींचा अमीर खान यांच्याविषयी लेख Archived 2008-12-19 at the Wayback Machine.