आफ्रिकन सॉसेज ट्री
आफ्रिकन सॉसेज ट्री हा मुळचा आफ्रिकेतील वृक्ष आहे. हा वृक्ष उष्णकटिबंधातील आफ्रिकेत उत्तरेत इरिट्रिया आणि चाडपासून दक्षिणेत दक्षिण आफ्रिकेचा उत्तर भाग आणि पश्चिमेला सेनेगल, नामिबिया पर्यंत आढळतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची फळं येतात. ती सॉसेज सारखी दिसतात.
वर्णन
संपादनहे झाड २० मीटरपर्यंत वाढते. त्याचे खोड सुरुवातील मऊ आणि करडे दिसते.
वर्षभर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे झाड सदाहरित असते आणि कमी पावसाच्या प्रदेशात पानगळी असते. त्याची पानं लंबगोल आकाराची २० सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद असतात. याची फुलसुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात. गडद जांभळ्या रंगाच्या या फुलांना चांगला वास नसतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची मातकट रंगाच्या दुधी भोपळ्यांसारखी लांब फळं येतात.
वापर आणि लागवड
संपादनयाचे कोवळे फळ विषारी असते. आफ्रिकेत याच्या पिकलेल्या फळापासून बीअरसारखे मद्य तयार केले जाते. ही फळे पडून झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांचे नुकसान होऊ शकते तसेच एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते.आफ्रिकेतील महिला या फळांचा उपयोग चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी करतात.या झाडाच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणून देखील करतात.याचे फळ चवीला तुरट आणि त्याचा वास कडू असतो.या झाडाच्या फळाचा उपयोग जखम झालेल्या ठिकाणी किंवा अल्सर साठी त्या फळाच्या चूर्णाचा उपाय जंतुनाशक म्हणून केला जातो.फुलांच्या पावडरचा उपयोग स्तनांच्या सूज आणि स्तनदाह कमी करण्यासाठी देखील वापरला जातो.दक्षिणी नायजेरियामध्ये लहान मुलांसाठी पेय म्हणून फळ वापरले जाते.मध्य आफ्रिकेत कच्चे फळ संधिवातासाठी वापरले जाते.पश्चिम आफ्रिकेमध्ये कच्चे फळ हे कृत्रिम अवयव म्हणून वापरले जाते.
भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई, गाझियाबाद या शहरांमध्ये ही झाडं आढळतात.