आनंद कुमार

भारतीय गणितज्ञ आणि शिक्षणतज्ञ

आनंद कुमार (१ जानेवारी, इ.स. १९७३ पाटणा; बिहार - हयात) हे भारतीय गणितज्ञ आहेत. हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम बिहारमध्ये 'सुपर-३०' या नावाने ते चालवितात.

आनंद कुमार

इ.स. १९९२ साली आनंदकुमारांनी 'रामानुजन स्कूल आॅफ मॅथेमॅटिक्स' ही संस्था सुरू केली. या संस्थेकडून मुलांची चाचणी घेऊन त्यातून ३० जणांची निवड केली जाते व त्यांना आयआयटी प्रवेश व इतर अनेक परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. डिस्कव्हरी वाहिनीने त्यांच्या या गणित वर्गावर एक तासाचा कार्यक्रम केला होता.

आनंदकुमारांचे गणितातील शोधनिबंध 'मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम' व 'द मॅथेमॅटिकल गॅझेट' या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत.

पुरस्कार संपादन

इ.स. २०१४ साली राजकोट येथे झालेल्या गणित संमेलनात आनंदकुमार यांना 'श्रीनिवास रामानुजन पुरस्कार' देण्यात आला. स्वामी ब्रम्हानंद पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन