आनंदराज आंबेडकर

भारतीय राजकारणी
(आनंदराज यशवंत आंबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)

आनंदराज यशवंत आंबेडकर ( २ जून १९६०) हे महाराष्ट्रातील राजकारणी व अभियंता आहेत. त्यांनी १९९८ मध्ये 'रिपब्लिकन सेना' नावाचा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यशवंत आंबेडकरांचे पुत्र व प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची (समतेचा पुतळा) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.

आनंदराज यशवंत आंबेडकर
जन्म २ जून १९६०
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण अभियांत्रिकी
पेशा राजकारणी
राजकीय पक्ष रिपब्लिकन सेना
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार मनिषा आंबेडकर
अपत्ये साहिल, अमन
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
रमाईमाई (आजी)
प्रकाश आंबेडकर (भाऊ)
भीमराव यशवंत आंबेडकर (भाऊ)

आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०११मध्ये आझाद मैदानात एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी सरकारला सांगितले की, इंदू मिल प्रकरणी ६ डिसेंबर २०११ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर महापरिनिर्वाण दिनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल. ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि तब्बल २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. "पोलीस बंदोबस्त चोख होता. पण आमचीही तयारी झाली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी कावा वापरायचं ठरवलं होतं," असे रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ निकाळजे सांगतात.[]

शिक्षण

संपादन

आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे पुण्याच्या राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. (अभियांत्रिकी ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन