आडगाव (श्रीवर्धन)
आदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. ह्या गावाला पूर्वी "कुंभारू" नावाने ओळखले जाई. कुंबळजा, बोडकरीण, दरवासकरीन अशा तीन देवी ग्रामदेवत म्हणून पूजल्या जातात. ह्या तिनही देव्यांची मंदिरे गावाच्या तिन दिशेला असून त्या गावाचे संरक्षण करतात व लक्ष ठेवतात अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे. कुंबळजा देवीचे मंदिर पश्चिमेस समुद्र किनाऱ्याला लागुन आहे. तर दरवासकरीनचे मंदिर आदगाव सर्वे रस्त्याने १ किमी. टेकडीवर आहे. आणि बोडणकरीन देवीचे मंदिर गौळवाडी मध्ये पूर्व दिशेला आहे.
?आदगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कुंबळजा देवीचे मंदिर पुरातन असून बेंन्द्रे कुंटूंबाची कुलदेवता आहे.
आदगावात प्रथम कोकाटे आणि मोरे वास्तव्यास आले अशी माहीती आहे. सिद्दी राजवटी मध्ये नवाब सिद्दीच्या दप्तरीत लेखणीक म्हणून श्री. सदाशिव विश्राम कोकाटे होते.
भौगोलिक स्थान
संपादनआदगाव श्रीवर्धन पासून २७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या उत्तरेकडे सर्वा, नानवली, दिघी ही गावे आहेत व दक्षिणेला वेळास, वडवली,बोर्ली पंचयतन, दिवेआगर ही गावे आहेत. आदगावला १किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
संपादनगावात प्रामुख्याने भातशेती केली जाते. त्या व्यतिरिक्त सुपारी, नारळ, आंबा, काजू ह्याचे ही उत्पादन केले जाते. नारळ सुपारी बागांना वाडी संबोधले जाते. मासेमारी व्यवसाय कोळी लोक मोठ्या प्रमाणात करतात. गावात वाणी, भंडारी, कुणबी, गवळी,बौद्ध, कोळी, कातकरी समाज आहे. सर्व सण एकत्रितपणे साजरे करतात. गणपती आणि शिमगा विशेष साजरा केला जातो. शिमग्याला होळीच्या दिवशी होम पेटवला जातो तर दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी सर्व घरासमोरून फिरवली जाते. महिला पालखीची देवीची पूजा करतात. ह्या सोहळ्यासाठी गावातून नोकरीसाठी मुंबई पुण्याला गेलेले चाकरमानी आवर्जून हजेरी लावतात. दहीहंडी सण वाणी आणि भंडारी समाज एकत्र उत्साहाने साजरा करतात. .
प्रेक्षणीय स्थळे
संपादननिसर्गरम्य व नयनरम्य असा समुद्र किनारा. गावापासून १ कि. अंतरावर समुद्रकिनाऱ्या लगत ग्रामदेवतेचे पुरातन मंदिर. शंकराचे मंदिर, धबधबा.
नागरी सुविधा
संपादनप्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत.एस टी बस सेवा, मासळी लिलाव बाजार, कस्टम आॕफिस, प्राथमिक आरोग्यकेंन्द्र, मेरीटाईम बोर्ड ह्या सेवा शासनामार्फत पुरवल्या जातात. हाॕटेल गावात नाहीत पण घरगुती पद्धतीचे जेवण व राहाण्याची उत्तम सोय ग्रामस्थांकडून केली जाते.==
जवळपासची गावे
संपादनउत्तरेकडे सर्वा, नानवली, दिघी गावे आहेत तर दक्षिणेकडे वेळास, वडवली, बोर्ली पंचतन, दिवेआगर ही गावे आहेत.