आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.

कोकणातील गावातील आठवडी बाजार

स्थानिक संस्था (नगर परिषद/ नगरपालिका) ,ग्रामपंचायत अश्या बाजाराची व्यवस्था करीत असते व त्या ठिकाणच्या सोयी करण्यास बाध्य असते.[१]

संदर्भ संपादन