आझाद समाज पार्टी

भारतातील राजकीय पक्ष
आझाद समाज पार्टी
पक्षाध्यक्ष चंद्रशेखर आझाद
स्थापना १५ मार्च २०२०
मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय तत्त्वे दलित समाजवाद, संविधानवाद

आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पक्षाची घोषणा करण्यात आली होती. राज्यघटनेचे रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष जातीयवाद आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.[][] जानेवारी २०२० मध्ये, युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल एस.एम. प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आज़ाद ने 'आजाद समाज पार्टी' नाम से राजनीतिक पार्टी की घोषणा की". ThePrint Hindi (इंग्रजी भाषेत). 2020-03-15. 2020-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ "बसपा के लिए चुनौती बनती नजर आ रही है आजाद समाज पार्टी". Hindustan (हिंदी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
  3. ^ "राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड". www.maxmaharashtra.com. 2021-01-03. 2021-01-05 रोजी पाहिले.