आगाखान पॅलेस

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू

आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे.[] या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. १८९२ मध्ये सुरू केली. १८९७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. १९४२ ते १९४४ या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाल

आगाखान पॅलेस, पुणे (इ.स. २००७)

पार्श्वभूमी

संपादन

सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने 'आगाखान हा किताब दिला होता. सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर जागा खरेदी केली. त्यावेळी पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा म्हणून या इमारतीचे बांधकाम त्यांनी सुरू केले. पूर्वी या इमारतीला 'येरवडा पॅलेस' म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. ७२ मीटर लांब आणि २१ मीटर रुंद अशी ही भव्य वस्तू आहे. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो. या प्रासादात सुलतान मोहम्मद शाह आणि त्यांचे कुटुंबीय काही काळ राहत असत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू ' भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे' ताब्यात घेतली.[]

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व

संपादन

इ.स. १९४२च्या 'चले जाव' चळवळीत, या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा गांधी यांना ९ ऑगस्ट १९४२ मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. ९ मे १९४४ रोजी गांधीजींची तेथून सुटका करण्यात आली. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांचे १५ ऑगस्ट १९४२ रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी येथेच बंदीवासात असताना निधन झाले. चार्ल्स कोरिया यांनी येथे दोघांच्या समाध्या बांधून घेतल्या.[] []आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्रे ठेवलेली आहेत.यामध्ये गांधीजींची भांडी, चपला, कपडे, माळ इ. गोष्टींचा समावेश आहे. गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. १९८० पासून गांधी स्मारक समिती आगा खान पॅलेसची व्यवस्था पाहते. []

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "आगाखान पॅलेस | District Pune ,Government of Maharashtra | भारत". 2021-10-02 रोजी पाहिले.
  2. ^ "गांधीमय आगाखान पॅलेस". Maharashtra Times. 2020-08-17 रोजी पाहिले.
  3. ^ Saran, Renu (2014-08-19). Monuments of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5165-298-4.
  4. ^ a b "Respecting our legacy". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2012-04-28. 2020-08-17 रोजी पाहिले.