आंबाडाळ

चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात .

साहित्य :

४_५ तास भिजवलेली चणाडाळ २वाट्या ,

४_५ हिरव्या मिरच्या ,

१/२ वाटी किसलेली कैरी

बारीक चिरलेली कोथिंबीर

आलं , कढिलिंब ,

फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं

हिंग, हळद

चवीप्रमाणे मीठ व साखर

सजावटीसाठी खोवलेला नारळ

कृती : भिजवलेली चनाडाळ चाळणीत उपसून ठेवावी .नंतर जाडसर वाटावी .त्यात वाटलेली मिरची, आलं ,कैरी ,मीठ व साखर घालून कालवावे .

थोडी कोथिंबीर घालावी .वरून तेल ,जीरं मोहरी व भरपूर कढिलिंब व हिंगाची फोडणी घालावी .सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा .