जागतिक कामगार दिन

राष्ट्रीय सुट्टीचा दिवस
(आंतरराष्ट्रीय कामगार दिन या पानावरून पुनर्निर्देशित)

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.[]

चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावरील "श्रमाचा विजय" समूहशिल्प

हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.[]

इतिहास

संपादन

सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती.[] या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला.[] ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.[]

या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली.[] त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.[]

हे सुद्धा पहा

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयीची माहिती व संसाधने" (इंग्लिश व अन्य अनेक भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  1. ^ a b "The Brief Origins of May Day | Industrial Workers of the World". www.iww.org (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b Foner, Philip Sheldon (1986-05-01). May Day: A Short History of the International Workers' Holiday, 1886-1986 (English भाषेत) (1st edition ed.). New York, NY: International Publishers. pp. ४१-४३. ISBN 9780717806249.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
  3. ^ a b Luxemburg, Rosa. "Rosa Luxemburg: What Are the Origins of May Day? (1894)". www.marxists.org. 2018-05-01 रोजी पाहिले.
  4. ^ Chicago Herald , May 5, 1886, quoted in Avrich. The Haymarket Tragedy. - P. pp. 209-210.