आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ

(आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल महासंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

फेदेराश्यों ॲंतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील (फ्रेंच: Fédération Internationale de l'Automobile ; लघुरूप: एफ.आय.ए) अर्थात आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आसोसिआश्यों ॲंतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस (फ्रेंच: Association Internationale des Automobile Clubs Reconnus ; लघुरूप: एआयसीर) या नावाने स्थापण्यात आली. विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून एफ.आय.ए.ची सर्वसामान्यांमध्ये परिचित आहे.

आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ
फेदेराश्यों ॲंतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील
Fédération Internationale de l'Automobile
लघुरूप एफ.आय.ए.
स्थापना २० जून, इ.स. १९०४
प्रकार क्रीडा संघटना
उद्देश्य मोटारस्पोर्ट्स
मुख्यालय फ्रान्स प्लास द ला कोंकोर्द
स्थान
सदस्यत्व
२२२ सदस्य संघटना
Leader फ्रान्स ज्याँ तोट
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

एफ.आय.ए.चे मुख्यालय पॅरीस, फ्रान्स येथील प्लास द ला कोंकोर्द या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए.मध्ये जगभरातील १२५ देशांमधील २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत. ज्याँ तोट हे एफ.आय.ए.चे अध्यक्ष आहेत.

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)